शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक शाखेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:03 IST

नाशिक शहर वाहतूक शाखेच्या वतीने सिडको तसेच पाथर्डी फाटा येथे बेशिस्त दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारकांवर कारवाई करून गेल्या तीन दिवसांत सुमारे ७५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले.

सिडको : नाशिक शहर वाहतूक शाखेच्या वतीने सिडको तसेच पाथर्डी फाटा येथे बेशिस्त दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारकांवर कारवाई करून गेल्या तीन दिवसांत सुमारे ७५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले. शहरातील अपघातांचे वाढते प्रमाणावर आळा घालण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, याचाच एक भाग म्हणून सिडकोतील त्रिमूर्ती चौक दिव्या अ‍ॅडलॅब, पाथर्डी फाटा, अंबड औद्योगिक वसाहत यांसह परिसरात विनाहेल्मेट व सीटबेल्ट न लावणाºया चारचाकी वाहनधारकांवर ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, तसेच सीटबेल्ट न लावणाºया चारचाकी वाहनधारकांवर तसेच कागदपत्रांची पूर्तता नसणाºया शेकडो वाहनधारकांना पकडण्यात येऊन नियमांचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक शाखेच्या वतीने हेल्मेट वापरण्याबाबत सूचना तसेच प्रबोधन करण्यात येत असल्याने अनेक वाहनधारक आता हेल्मेटचा वापर करीत असल्याचे दिसून येत असले तरी अजूनही अनेक वाहनधारक हे विनाहेल्मेट दुचाकी चालवित असल्याने ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले. याबरोबरच दिव्या अ‍ॅडलॅब परिसरासह मुख्य चौक तसेच गर्दीच्या ठिकाणी वाहन पार्किंग करणाºयांची वाहनेदेखील वाहतूक शाखेच्या गाडीत नेत त्यांच्यावरदेखील दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. नाशिक शहर वाहतूक शाखेच्या वतीने पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा सुजाण नागरिकांच्या वतीने स्वागत करण्यात येत असून, अपघाताला आळा घालण्यासाठी नागरिकांनी वाहतूक शाखेचे नियम पाळणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.