नाशिक : त्याग, बलिदानाची शिकवण देणारा ‘ईद-उल-अज्हा’ अर्थात बकरी ईद शहर व परिसरात पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. यानिमित्त शहाजहांनी ईदगाह मैदानावर सामूहिक नमाजपठणाचा पारंपरिक सोहळा उत्साहात व शांततेत पार पडला. यावेळी हजारो समाजबांधवांनी सामूहिक नमाजपठण केले.दरवर्षी अखेरचा उर्दू महिना ‘जिलहिज्जा’च्या १० तारखेला बकरी ईद साजरी केली जाते. सकाळपासूनच नमाजपठणासाठी लगबग दिसून येत होती. आबालवृद्धांनी नवीन कपडे परिधान करून मशिदींमध्ये नमाजपठणासाठी हजेरी लावली, तर शहरातील बहुसंख्य मुस्लिमांनी पारंपरिक प्रथेनुसार शहाजहांनी ईदगाह मैदानावर शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली ईदच्या विशेष नमाजचे सामूहिक पठण केले.
बकरी ईद शहर व परिसरात पारंपरिक पद्धतीने साजरी
By admin | Updated: October 7, 2014 01:37 IST