शहरं
Join us  
Trending Stories
1
आता इस्लामिक देश कतारवरच इराणचा हल्ला, येथेच आहे अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस; सहा क्षेपणास्त्रे डागली
2
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
3
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
4
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
5
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
6
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
7
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
8
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
11
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
12
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
13
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
14
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
15
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
16
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
17
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

भाकरी फिरविण्याची परंपरा

By admin | Updated: June 11, 2014 00:21 IST

लोकसभेच्या निवडणुकीकडेही होऊ घातलेल्या विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनच पाहिले गेले; परंतु गेल्या निवडणुकीत आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघाने समीकरणे बदलून टाकली आहेत.

 दलित-मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान, तर दुसरीकडे उमेदवार व त्याचा राजकीय पक्ष पाहून मतदान करणारे मतदार असा काहीसा विचित्र परंतु भाकरी करपू नये म्हणून नेहमी ती फिरवत ठेवणारा मतदारसंघ म्हणून नाशिक मध्य मतदारसंघाची ओळख असली, तरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने मतदारांचे सामाजिक धु्रवीकरण झाले, ते पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत यापेक्षा काही वेगळी भूमिका हा मतदारसंघ घेईल असे वाटत नाही. पाच वर्षांपूर्वीच्या लोकसभा व त्यापाठोपाठच्या विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहता, आत्ता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीकडेही होऊ घातलेल्या विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनच पाहिले गेले; परंतु गेल्या निवडणुकीत आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघाने सामाजिक व राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत. तसे पाहिले, तर एकीकडे मराठा व दुसरीकडे मराठेतरांची संख्या, कॉलनी, उंच इमारतींचे एकीकडे जाळे, तर दुसरीकडे विस्तीर्ण झोपडपट्टी अशी भौगोलिक व सामाजिक परिस्थिती असलेल्या या मतदारसंघाने मात्र कधीच कोणा एकाच्या दावणीला बांधून घेतले नाही, की कोणामागे फरफटतही गेला नाही. कारण आजवरच्या झालेल्या प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांना येथील मतदारांनी भाकरी फिरवून त्याची प्रचिती आणून दिली आहे. अगदी मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यावेळी म्हणजेच सन २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीचा अभ्यास केल्यास, जशी राजकीय परिस्थिती बदलली तशीच सामाजिक परिस्थितीही या मतदारसंघाने बदलली आहे. त्यापूर्वीच्या निवडणुकांमध्येही यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती. कोणताही एक उमेदवार व त्याच्या पक्षाला या मतदारसंघाने कधीच साथ दिली नाही. त्यामुळे गेल्या लोकसभा व त्यापाठोपाठच्या विधानसभा व नुकत्याच झालेल्या लोकसभा अशा तीनही निवडणुकीत एकच साम्य होते, ते म्हणजे एक माळी विरुद्ध दोन मराठे. त्यामुळे राजकीय पातळीवर जशी या मतदारसंघाची चर्चा होते, तशीच ती आता सामाजिक व थोडक्यात जाती-पातीवरही होऊ लागली आहे. याला कारणही तसेच आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मराठेतर उमेदवार म्हणून समीर भुजबळ हे मैदानात उतरले व एकदा का मतदारसंघ समीरच्या व पर्यायाने छगन भुजबळ यांच्या ताब्यात गेला तर आपले राजकीय अस्तित्वच संपुष्टात येईल या भीतीने त्यांच्या उमेदवारीला सामाजिक कारणातून विरोध झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही झाली. फरक इतकाच होता, समीरला खुला विरोध झाला, तर छगन भुजबळ यांच्या बाबतीत तो सुप्त पण उद्रेकाच्या स्वरूपाचा होता. त्यामुळे या मतदारसंघातील लोकसभेच्या लढतीत एकीकडे एक विशिष्ट समाजघटक भुजबळ यांच्या उमेदवारीला विरोध करीत असताना, दुसरीकडे तितकाच इतरेतर समाज एकवटून त्यांच्या समर्थनार्थ उभा राहिला; परंतु त्याचा आवाज फारच क्षीण होता. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे नाशिक लोकसभा असो वा विधानसभा, ज्यांनी-ज्यांनी यापूर्वी प्रतिनिधित्व केले, त्यातील माजी खासदार राजाभाऊ गोडसे वगळता सारेच उमेदवार याच विधानसभा मतदारसंघात वास्तव्यास आहेत. त्यामुळे नाही म्हटले तरी त्यांचे नातेगोते, हितचिंतक, मित्रपरिवार यांचाही नेहमीच प्रत्येक निवडणुकीत प्रभाव राहिला आहे. पण गेल्या लोकसभा निवडणुकीत व नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही चित्र वेगळे होते. मध्य विधानसभा मतदारसंघाबाहेरीलच तिघे उमेदवार लोकसभेच्या रिंगणात होते. त्यातही ज्यांना या निवडणुकीआड विधानसभेची तयारी करायची होती, त्यांनी गेल्या लोकसभेला व आत्ताच्याही लोकसभेआड ती करून घेतली. फरक इतकाच, की गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला दुसऱ्या क्रमांकाची मते देणाऱ्या या मतदारसंघाने समीर भुजबळ यांना मोठी आघाडी दिली किंबहुना त्यांच्या विजयात याच मतदारसंघाचा हातभार लागला होता. त्यामुळे नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही राष्ट्रवादीला याच मतदारसंघातून फार मोठ्या अपेक्षा होत्या. विशेष म्हणजे, मतदानाच्या दिवशी दुपारनंतर मतदान केंद्रावर लोटलेली गर्दी पाहून तसे वातावरण निर्मितीही करण्यात आली होती. प्रत्यक्षात या गर्दीचाही उपयोग राष्ट्रवादीला होऊ शकला नाही. उलट राष्ट्रवादीला दुसऱ्या व मनसेला तिसऱ्या क्रमांकावर लोटून या मतदारसंघाने सेनेच्या पदरात भरभरून दान टाकून एक क्रमांकावर नेऊन ठेवले. आजवरच्या निवडणुकीत कॉँग्रेस आघाडीची या मतदारसंघातील दीड लाखाच्या आसपास एकगठ्ठा असलेल्या दलित-मुस्लीम मतदारांवर भिस्त राहिली व काही काळ ती रास्तही होती, तर विरोधकांच्या दृष्टीने मध्यमवर्गीय परंतु मतदानाबाबत नेहमीच नकारात्मक असलेल्या मतदारांचा निरुत्साह ही डोकेदुखी होती. या दोन्ही गोष्टी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोडीत निघाल्या. सत्ताधाऱ्यांविरुद्धचा रोष जसा एकगठ्ठा मतदारांनी काढला, तसाच तो दरवेळी निरुत्साह दाखविणाऱ्या मतदारांनीही घराबाहेर पडून दाखविला. त्यातून एक गोष्ट पुन्हा सिद्ध झाली की, एक उमेदवार व त्याच्या राजकीय पक्षाला हा मतदारसंघ पुन्हा पुन्हा साथ देत नाही. मध्य विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत काय परिस्थिती असेल याचा अंदाज बांधताना, गेल्या निवडणुकीतील इतिहास, त्यानंतर बदललेल्या राजकीय समीकरणांचाही विचार करणे क्रमप्राप्त आहे. त्याचबरोबर मतदारसंघातील प्रश्न, वर्षानुवर्षांच्या समस्या व विद्यमान लोकप्रतिनिधींनी केलेली कामे याचाही ताळमेळ घालावा लागेल. लोकसभा निवडणुकीत मतदारांचा बदललेला कौल पाहता, विधानसभा निवडणुकीतही भाकरी फिरेल असे मानावयास हरकत नाही.