शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सभापतींसह व्यापाऱ्यांना मारहाण

By admin | Updated: August 4, 2016 01:06 IST

लासलगावी कांदा आंदोलकांचा उद्रेक : आज लासलगाव बंद

 लासलगाव : गोणीपद्धतीने कांदा लिलावाविरुद्धच्या आंदोलनाने बुधवारी लासलगावी वेगळे वळण घेतले असून, लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर आणि काही व्यापाऱ्यांना आंदोलकांनी मारहाण केल्याने बाजार समितीत काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे काहीकाळ लिलाव बंद झाले होते. निफाडचे पोलीस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे व लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर सायंकाळी लिलाव सुरू करण्यात आले. दरम्यान मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी (दि.४) लासलगाव बंदचे आवाहन करण्यात आले आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन कांदा आवारात बुधवारी सकाळी दहा वाजता सर्वपक्षीय नेत्यांसह श्ोतकऱ्यांनी गोणी पध्दतीच्या विरोधात आंदोलन करीत लिलाव होऊ न देण्याची भूमीका घेतली. या आंदोलनानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर आपल्या कार्यालयात व्यापारी वर्गाशी चर्चा करीत असतांना माजी सभापती नानासाहेब पाटील यांच्यासह काही शेतकऱ्यांसह कार्यालयात घुसले. या जमावाने अचानक आक्रमक पवित्रा घेत सभापती जयदत होळकर यांच्यावर काठीने तसेच लोखंडी पाईपने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बाजार समितीचे कर्मचारी दत्तात्रय होळकर यांनी बचाव केल्याने सभापती यांच्या टेबलवरील काच फुटली. जमावाने या ठिकाणी उपस्थित काही व्यापाऱ्यांनाही मारहाण केली. लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे व उपनिरीक्षक दिपक आवारे यांच्यासह उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी शेतक-यांना पांगविले. यामुळे तीन ते सहा वाजेपर्यंत बाजार समिती आवारात तणावाचे वातावरण होते. मारहाणीमुळे व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी होण्यास नकार दिला . या नंतर तातडीने वाढीव पोलीस कुमक लासलगाव येथे दाखल झाली. निफाडचे पोलीस उपअधीक्षक दिपक गिर्हे व लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे ,सभापती जयदत्त होळकर पंढरीनाथ थोरे , ललीत दरेकर , सचिन ब्रम्हेचा व व्यापारी यांची संयुक्त बैठक घेतली त्यास शेतकरी प्रतिनिधी म्हणून राजाराम दरेकर बाबासाहेब गुजर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. या सभेत सुमारे तासभर चर्चा झाल्यानंतर आलेल्या कांद्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला.यानंतर सभापती जयदत्त होळकर व संचालक पंढरीनाथ थोरे हे व्यापाऱ्यांसह दाखल झाले.व सकाळ पासून न झालेले लिलाव सुरू करण्यात आले.(वार्ताहर)