सिडकोतील त्रिमूर्ती चौक ते संभाजी चौक दरम्यान उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. संभाजी चौक ते त्रिमूर्ती चौक या दरम्यान अनेक लहान-मोठे व्यावसायिक असून उड्डाणपूल उभारल्यानंतर या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होऊन त्यांच्यावर व्यवसाय बंद करण्याची वेळ येणार आहे. त्याचबरोबर शेकडो वर्षांची परंपरा असलेला म्हसोबा महाराज वटवृक्ष तोडण्यात येणार असून ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. या पुलामुळे उंटवाडी ग्रामस्थांचेही नुकसान होणार असून, त्यामुळे महानगरपालिकेने याठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचा प्रयत्न करू नये. उड्डाणपुलाचे काम जबरदस्तीने केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनही करू असा इशारा रिपाइंचे नेते किशोर घाटे, आशिष शुक्ल, पितांबर पवार, हिरामण बोडके, ज्ञानेश्वर जाधव, समाधान जाधव, नानासाहेब ठाकरे, बापू नागपुरे, ज्ञानेश्वर खरगडे, भाऊसाहेब लगरे, तेजस दुसाने, विनायक वाघमारे यांनी दिला आहे.
उड्डाणपुलाला व्यापाऱ्यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:41 IST