शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सम-विषम पद्धतीला व्यापाऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 22:56 IST

कळवण : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता सम-विषम तारखांनुसार कळवण शहरात दुकाने सुरू राहणार असून, याबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कळवणचे प्रांतधिकारी विजयकुमार भांबरे यांनी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकाची कळवण नगरपंचायत हद्दीत अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्य अधिकारी सचिन माने यांनी दिली. दरम्यान, या सम-विषम धोरणाला कळवण शहरातील व्यापारी बांधवांनी मात्र विरोध दर्शविला आहे.

ठळक मुद्देकळवण : नगरपंचायत अंमलबजावणीसाठी सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता सम-विषम तारखांनुसार कळवण शहरात दुकाने सुरू राहणार असून, याबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कळवणचे प्रांतधिकारी विजयकुमार भांबरे यांनी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकाची कळवण नगरपंचायत हद्दीत अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्य अधिकारी सचिन माने यांनी दिली. दरम्यान, या सम-विषम धोरणाला कळवण शहरातील व्यापारी बांधवांनी मात्र विरोध दर्शविला आहे.राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली, मात्र त्याचा उलटा परिणाम झाला. नागरिकांनी अनावश्यक गर्दी करून नियम धाब्यावर बसवल्यामुळे जिल्हा प्रशासनाने खंबीर भूमिका घेऊन नगरपंचायत हद्दीतील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी सम-विषम धोरण आखले. आता या धोरणाची अंमलबजावणी करण्याची सूचना तहसीलदार बी. ए. कापसे यांनी कळवण नगरपंचायत प्रशासनाला दिली आहे.कळवण शहरातील व्यापारीपेठा सुरू झाल्यामुळे तालुक्यातील व शहरातील नागरिकांची सकाळी ९ ते ५ या वेळात प्रचंड गर्दी वाढली. सातत्याने वाढणाºया गर्दीमुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.पूर्व पश्चिम लेन रस्त्याच्या दुतर्फा उत्तराभिमुख सम तारखेला व पश्चिमाभिमुख दुकाने विषम तारखेला सुरु राहतील. दक्षिण उत्तर लेन रस्त्याच्या दुतर्फा पूर्वाभिमुख सम तारखेला व पश्चिमाभिमुख दुकाने विषम तारखेला सुरू राहतील. पूर्व पश्चिम लेनमध्ये मेनरोड, शाहीर लेन, सुभाषपेठ, वडगल्ली, गांधी चौक ते मेनरोड पूल, एकलहरे रोड या परिसराचा समावेश आहे. दक्षिण-उत्तर लेनमध्ये जुना ओतूर रोड, सबस्टेशन रोड, नवीन ओतूर रोड, नाकोडा रोड या परिसराचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार