शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी म्हणतात, डाळ जैसे थे !

By admin | Updated: July 22, 2016 00:42 IST

ग्राहक मेटाकुटीला : अन्यत्र दर घटले; बाजारात कायम

 नाशिक : एकीकडे मॉल्समध्ये व अन्य ठिकाणी तूरडाळीचे दर घसरले असताना, शहरातील व्यापाऱ्यांकडे मात्र १३० ते १४० रुपये प्रतिकिलोचा दर कायम आहे. तूरडाळीचे दर एवढ्यात घटलेले नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, यामुळे सर्वसामान्य ग्राहक मात्र मेटाकुटीला आल्याचे चित्र आहे. गेल्या आॅगस्ट महिन्यानंतर तूरडाळीचे दर भडकण्यास सुरुवात झाली. दोन वर्षांपासूनचा दुष्काळ, व्यापाऱ्यांनी केलेली साठेबाजी यामुळे गेल्या वर्षी सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात दररोज लागणाऱ्या तूरडाळीचे दर तब्बल दोनशे रुपयांपर्यंत वधारले. या मुद्द्यावरून बरेच राजकारणही तापले. गेल्या वर्षीची दिवाळी नागरिकांना महागाईच्या सावटाखालीच साजरी करावी लागली. त्यानंतर नवी तूरडाळ येताच जानेवारीनंतर हळूहळू दर घटण्यास सुरुवात होऊन डाळ १४० रुपये प्रतिकिलोपर्यंत स्थिरावली; मात्र गेल्या एप्रिल महिन्यापासून पुन्हा डाळ भडकू लागल्याने राज्य सरकारने डाळ दर नियंत्रण कायदा मंजूर करीत साठेबाजी व दरवाढीला चाप लावण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यानंतरही डाळीच्या किमती आणखी उतरू शकल्या नाहीत. दरम्यान, सध्या मॉल्समध्ये तूरडाळ शंभर रुपये प्रतिकिलोपर्यंत उपलब्ध झाली असताना, शहरातील व्यापाऱ्यांनी मात्र तूरडाळीचे दर घटले नसल्याचा पवित्रा घेतला आहे. मोठ्या उद्योजकांनी साठेबाजी करून ठेवल्याने त्यांना कमी किमतीत डाळ विकण्यास परवडत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या शहरात १३० ते १४० रुपये प्रतिकिलो दरानेच डाळ उपलब्ध होत आहे. (प्रतिनिधी)