शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

व्यापार, व्यापारी वाचविण्यासाठी दुकाने सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:11 IST

नाशिक : शहरातील कोरोनाचे संकट वाढल्याने प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिकमधील सर्व व्यापारी संस्था आणि संघटनांनी शासननिर्णयाचे ...

नाशिक : शहरातील कोरोनाचे संकट वाढल्याने प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिकमधील सर्व व्यापारी संस्था आणि संघटनांनी शासननिर्णयाचे पालन करीत शहरातील दुकाने पूर्णपणे बंद ठेवून कोरोना नियंत्रणाच्या मोहिमेला पाठिंबा दिला; परंतु आता कोरोनाची रुग्णसंख्या घटली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याने शहरातील व्यापार आणि व्यापारी वाचविण्यासाठी १ जूनपासून दुकाने सुरू करण्याची मागणी कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सतर्फे (कॅट) करण्यात आली आहे.

नाशिक शहरातील सर्वसामान्य व्यापाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांची दुकाने पूर्णपणे बंद ठेवली असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. व्यावसायिकांना रोजच्या खर्चासह दुकान भाडे, विमा पॉलिसी, कर्ज हफ्ते, कामगारांचे पगार वीज बिल, बँकांचे व्याज आणि शासनाचे विविध कर हे रोजच्या रोज होणाऱ्या व्यवसायातून मि‌‌ळणाऱ्या उत्पन्नातून भागवावे लागतात. मात्र, सध्याच्या स्पर्धेच्या युगात एकीकडे ऑनलाइन पद्धतीने होणारा व्यापार आणि दुसरीकडे मागील काही महिने चाललेले लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान यातून व्यावसायिकांना धंदा करणे अवघड झाल्याचे नमूद करीत दुकाने पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.

इन्फो-

वीज बिल, बँकेच्या व्याजात सवलतीची मागणी

मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये केंद्र शासनाकडून काही बाबतीत सूट दिली होती. या लॉकडाऊनमध्ये तसे कुठलेही पॅकेज शासनाने जाहीर केलेले नसल्याचे नमूद करीत व्यापाऱ्यांनी वीज बिलात चार महिने सूट मिळावी, बँकेच्या व्याजावर माफी मिळावी, दुकानाच्या भाड्यामध्ये सूट मिळावी, खेळते भांडवलासाठी बँकांना निर्देश द्यावे, तसेच जीएसटीत माफी, कामगारांचे पगार यासाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी कॅटच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विमा पॉलिसीला मुदत वाढ मिळावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

कोट-

कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने १ जूनपासून सर्व दुकाने कमीत कमी दहा तास तरी दुकाने चालू ठेवणे आवश्यक आहे. कोरोनासंबंधी सर्व दिलेल्या मार्गदर्शक सूचना यांचा व्यापारी निश्चितच अवलंब करतील.

- संजय सोनवणे, उपाध्यक्ष, कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स