शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर नदीपात्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 01:18 IST

वीरगाव : येथूनच जवळ असलेल्या कान्हेरी नदीच्या पुलावरून कांद्याने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह नदीपात्रात पलटी झाल्याने यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असून, त्यास मालेगाव येथील खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देदोघे गंभीर जखमी : वीरगाव येथील घटना

वीरगाव : येथूनच जवळ असलेल्या कान्हेरी नदीच्या पुलावरून कांद्याने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह नदीपात्रात पलटी झाल्याने यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असून, त्यास मालेगाव येथील खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले.एकावर सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केले जात असून, हे दोन्हीही बागलाण तालुक्यातील डोंगरेज येथील रहिवासी आहेत. डोंगरेज येथील उत्तम ग्यानदेव खैरनार आपल्या मालकीच्या ट्रॅक्टरमधून गुरुवारी सटाणा येथील बाजार समितीत कांदा विक्र ीसाठी जात होते. मात्र घरापासून काही अंतरावरच बिघाड होऊन ट्रॅक्टर बंद पडल्याने खैरनार यांनी गावातील दुसरा ट्रॅक्टर आणून नादुरुस्त ट्रॅक्टर याच अवस्थेत सटाणा शहराकडे ओढून नेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान ट्रॅक्टर पात्रात फेकले गेले. अपघातानंतर वीरगाव येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातातील गोरख पवार व दादाजी दुबळा सोनवणे यांना रुग्णालयात दाखल केले. डोंगरेज व वीरगावच्या मध्यभागी असलेल्या कान्हेरी नदीजवळील तीव्र उतारावर नादुरु स्त ट्रॅक्टरचे ब्रेक निकामी झाल्यामुळे दोन्ही ट्रॅक्टर कांद्याने भरलेली ट्रॉलीसह नदीपात्रात फेकले गेले. यात दोन्हीही ट्रॅक्टरचे चालक गंभीर जखमी झाले, तर ट्राली यात पलटी होऊन कांदा नदीपात्रातफेकला गेला.