शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
4
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
5
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
6
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
7
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
8
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
9
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
10
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
11
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
12
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
13
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
14
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
15
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
16
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
18
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
19
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
20
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान

पांडवा, चिवटीबारीतील धबधबे खुणवताहेत पर्यटकांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 12:38 IST

नितीन बोरसे*सटाणा : गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे बागलाणच्या पश्चिम पट्ट्यासह गुजरात सीमेलगत डोंगर दर्यांमधून ओसंडून वाहत असलेले धबधबे पर्यटकांना खुणवत आहेत.सध्या बागलाण तालुक्यातील सीमेलगत असलेला पांडवा धबधबा व धुळे जिल्ह्याच्या सीमेवरील चिववटीबरीतला धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे.

नितीन बोरसे*सटाणा : गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे बागलाणच्या पश्चिम पट्ट्यासह गुजरात सीमेलगत डोंगर दर्यांमधून ओसंडून वाहत असलेले धबधबे पर्यटकांना खुणवत आहेत.सध्या बागलाण तालुक्यातील सीमेलगत असलेला पांडवा धबधबा व धुळे जिल्ह्याच्या सीमेवरील चिववटीबरीतला धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. तालुक्यातील पश्चिम पट्टा व त्याला लागून गुजरातचा डांग परिसर सर्वदूर हिरवाईने नटलेला आहे.त्यामुळे साहजिकच पर्यटकांचे आकर्षण बनत आहे. साल्हेर ,मुल्हेर ,नाव्ह्या किल्ला चिवटीबारी परिसरात गेल्या चार दिवसांपासून पाऊस सुरु आहे.या पावसामुळे या भागातील डोंगर दर्यातून वाहत असलेले छोटेमोठे धबधबे पर्यटकांना भुरळ घालत आहे.यामुळे गेल्या चार पाच दिवसांपासून या भागात पर्यटकांनी चांगली गर्दी केली आहे.या भागातील पांडवा व चिववटीबारीतील धबधबे हे प्रमुख आकर्षण आहे.-------------------------कसे जाणार पांडव्याला......बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतराव पांडवा आहे.पांडव्याला जाण्याचे दोन मार्ग एक साल्हेर मार्गे मानूर ,गडद मार्गे पांडवा दुसरा मार्ग मुल्हेर ,बाभूळणे ,चिंचलीघाटातून पांडव्याला जाता येते.साल्हेर वरून गेल्या साल्हेर किल्ला बघता येतो.तसेच येथील गणपतीघाटा समोरील रिटर्न फॉल बघायला मिळतो .मानूर मार्गे जातांना गडद येथील गिधाडसाठी संरिक्षत प्रकल्प बघायला मिळेल.तेथून पांडवा येथील घनदाट जंगल आण ितेथील धबधबे आकर्षण आहे.पांडवा येथील भर जंगलात दुमजली ब्रिटिशांनी बांधलेले विश्रामगृह आहे.या विश्रामगृहच्या दक्षिणेला डोंगरावर दोन किलोमीटर अंतरावर पांडवा धबधबा आहे.धबधब्या कडे जाण्यासाठी पूर्ण चढाईचा मार्ग आहे.या जंगलातील गुहांमध्ये पांडवांचे अनेक वर्ष वास्तव्य होते.त्यामुळेच याभागाला पांडवा नावाने ओळखले जात असल्याची आख्यायिका आहे.घनदाट जंगलातील डोंगर कपारातून सुमारे साठ फुट उंचीवरून कोसळणार्या धबधब्याच्या धारा पर्यटकांना आकर्षित करतात.याच धबधब्यावर पडणार्या सूर्यिकरणामुळे इंद्रधनुष्य मोहून घेत असतो.या धबधब्याला लागुनच पांडवांचे वास्तव्य असलेल्या मोठमोठ्या गुहा आहेत.येथे भाविक पूजाअर्चा देखील करतात.धबधबा पाहण्यासाठी वनविभागाने पायर्या तयार केल्या आहेत. चिवटीवारीतील नेकलेस फॉल देखील आकर्षण आहे.बागलाण तालुक्यातील मुल्हेर गापासून उत्तरेकडे सुमारे आठ किलोमीटर अंतरावर बोर्हाटे गाव आहे.या गावाची हद्द आण िधुळे जिल्ह्याच्या सीमेवर हा नेकलेस फॉल बघायला मिळतो ,छोटेछोटे धबधबे तर अनेक आहेत.परंतु बारीच्या पूर्वेला असलेल्या डोंगरदर्यांतून हा नेकलेस फॉल सर्वाचेच आकर्षण आहे.सुमारे अडीचशे फुट उंचीवरून हा धबधबा वाहतो.बारीच्या पूर्वेकडून पाचशे फुट खोल दरीतून पायवाटेने या धबधब्याकडे जाण्याचा मार्ग आहे.या भागात मोर ,ससे,बिबटे ,लांडगे तसेच निरनिराळे पक्षी देखील बघायला मिळतात. यामुळे ही सफर नक्कीच यादगार होते.

टॅग्स :Nashikनाशिक