शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
2
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
3
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
4
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
5
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
6
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
7
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
8
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
9
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
10
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
11
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
12
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
13
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
14
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
15
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
16
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
17
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
18
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
19
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
20
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?

पर्यटनाला मिळतेय चालना

By admin | Updated: September 27, 2014 00:16 IST

पर्यटनस्थळांचा विकास : पर्यटकांच्या ‘मुक्काम’ वाढीसाठी प्रयत्न; लौकिकात भर

नाशिक : ऐतिहासिक व धार्मिक-पौराणिक महत्त्व असलेले शहर म्हणून नाशिकची ओळख असली, तरी अलीकडे वायनरी सिटी म्हणून शहराच्या नावलौकिकामध्ये भर पडत आहे. त्याचप्रमाणे राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने शहराच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी नवनवीन प्रयोग विशेषत: गंगापूर गावाच्या शिवारात केले जात आहे. शहरापासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटरवर अंतरावर असलेल्या गंगापूर धरण परिसरात सुसज्ज अद्ययावत आधुनिक पद्धतीचे बोटिंग क्लब विकसित केले जात आहे, जेणेकरून नाशिकला पर्यटकांचा मुक्काम वाढीसाठी मदत होणार आहे. शासनाकडून यासाठी जलसंपदा विभागाला पर्यटन निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून जलसंपदा विभागामार्फत सध्या गंगापूर धरणालगत बोटिंग क्लब विकसित केला जात असून, बोटिंग क्लबचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या ठिकाणी जलसंपदा विभागाकडून एकूण ३७ बोटी खरेदी केल्या जाणार आहेत. यामध्ये साधारणत: वीस बोटी या इंजिनवर चालणाऱ्या, तर उर्वरित बोटी या नावाड्यांमार्फत चालविल्या जाणार आहेत. गंगापूर धरणाच्या निसर्गरम्य परिसरात नौकाविहार करण्याचा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे. येत्या काही महिन्यांत बोटिंग क्लबचे काम पूर्णत्वास येऊन जलसंपदा विभागाकडून राज्याच्या पर्यटन विकास महामंडळाकडे हा प्रकल्प हस्तांतरित के ला जाणार आहे. त्याचप्रमाणे गंगापूर-गोवर्धन शिवारातच दिल्लीच्या हाट बाजारच्या धर्तीवर सुमारे चार हजार चौरस मीटर जागेवर ‘नाशिक कलाग्राम’ साकारला जात आहे. कलाग्रामचेदेखील बांधकाम वेगाने सुरू असून, अकरा महिन्यांच्या मुदतीत हा प्रकल्प पूर्ण के ला जाणार आहे. पायाच्या वरपर्यंत बांधकाम आले असून, संरक्षक भिंतही उभारण्यात आली आहे. या कलाग्राममध्ये एकूण शंभर दुकाने उपलब्ध क रण्यात येणार आहेत. याचबरोबरच स्थानिक कलावंतांच्या कलेलादेखील याठिकाणी व्यासपीठ मिळणार आहे. याचबरोबर कलाग्रामच्या आवारात प्रशासकीय इमारत, सभागृह, पर्यटकांसाठी राहण्याची व्यवस्था म्हणून ‘लोकनिवास’ची देखील सुविधा देण्यात येणार आहे. एकूणच नाशिकला येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढण्याबरोबरच त्यांचा शहरात मुक्काम करण्याचादेखील कल कसा वाढेल यासाठी पर्यटन विभाग प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. नाशिकच्या द्राक्षांची चव जगभर प्रसिद्ध असून, या द्राक्षांपासून निर्माण केली जाणारी वाईनदेखील जगभर पोहचली आहे.दरवर्षी येथील प्रसिद्ध वाईनच्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी शेकडो विदेशी पर्यटक हजेरी लावतात. त्यामुळे या पर्यटकांचा नाशिकला मुक्काम वाढावा व त्या माध्यमातून शहराला उत्पन्न प्राप्त होऊन विकास साधला जावा यासाठी गंगापूर शिवारात कलाग्राम, बोटिंग क्लब यांसारखे पर्यटनपूरक प्रकल्प साकारले जात आहेत. पर्यटनाला चालना देणाऱ्या अशा प्रकल्पांमुळे आगामी काळात नाशिकचे पर्यटन अधिक विकसित होणार आहे. (प्रतिनिधी)