शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमधील पर्यटनबंदी केवळ कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 01:25 IST

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण फैलावत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनस्थळांवर बंदी कायम ठेवली आहे. मात्र त्र्यंबकेश्वर, भावली, गंगापूर भागात रविवारी (दि.५) झालेल्या गर्दीमुळे ही बंदी केवळ कागदावरच आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देवर्षासहली सर्रास सुरू : गंगापूर, अंजनेरी, त्र्यंबकेश्वर, भावली भागात लोंढे

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण फैलावत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनस्थळांवर बंदी कायम ठेवली आहे. मात्र त्र्यंबकेश्वर, भावली, गंगापूर भागात रविवारी (दि.५) झालेल्या गर्दीमुळे ही बंदी केवळ कागदावरच आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.नाशिक शहर व परिसरातील लोक वीकेण्डला पावसाळी सहलींचा आनंद घेण्यासाठी शहराबाहेरील निसर्गरम्य ठिकाणी तसेच धरण परिसरांमध्ये भटकंतीकरिता बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. यामध्ये तरुणाईची संख्या अधिक आहे. लॉकडाऊन शिथिल करण्यात आला असला तरीदेखील पर्यटनाकरिता प्रवासावर निर्बंध कायम आहे. मात्र नागरिक नियम झुगारून पावसाळी सहलींचा आनंद लुटण्यासाठी अंजनेरी, पहिने-पेगलवाडी परिसरातील ओहोळ व धबधब्याच्या ठिकाणी गर्दी करत असल्याने पोलिसांकडून नाकाबंदी करत दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच हरसूल पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक विशाल टकले यांच्या मार्गदर्शनाखाली कश्यपी धरण परिसरात गस्त सुरू होती.शहरासह जिल्ह्यात यावर्षी कोरोनाचे संक्रमण तेजीत असल्यामुळे नागरिकांनी पर्यटनासाठी घराबाहेर पडू नये तसेच पावसाळ्यात धरण परिसर, धबधबे व डोंगररांगा, घाटमाथ्याच्या परिसरात भटकंती टाळावी जेणेकरून दुर्घटनांना निमंत्रण मिळणार नाही. तीन दिवसांपूर्वीच वासाळी शिवारातील एका पाझर तलावात बुडून अंबडमधील दोघा मित्रांचा मृत्यू झाला होता.भावली धरणाकडे जाणाºया पिंप्रीसदो गावाच्या फाट्यावर महामार्गालगतच इगतपुरी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. या ठिकाणावरून पर्यटकांना माघारी पाठविले जात होते. तसेच पिंप्रीसदो ते थेट भावली धबधब्यापर्यंत पोलिसांनी गस्तही वीकेण्डला वाढविली होती.कोरोनामुळे या भागातील वर्षासहल पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.कोरोनामुळे जिल्ह्यात कोठेही पर्यटनासाठी जाण्यास परवानगी नाही. यामुळे नागरिकांनी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धरण, धबधब्यांच्या परिसरात निसर्गरम्य ठिकाणी जाणे टाळावे. पोलीस ठाणेप्रमुखांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.- डॉ. आरती सिंहपोलीस अधीक्षक, नाशिक जिल्हा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या