शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
3
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
4
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
5
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
6
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
7
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
8
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
9
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
10
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
11
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
12
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
13
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
14
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
15
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
16
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
17
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
18
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
19
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
20
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र

धड धड वाढते ठोक्यात...!

By admin | Updated: February 20, 2017 00:43 IST

धड धड वाढते ठोक्यात...!

नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीसाठी काउंटडाउन सुरू झाले असून, अवघ्या काही तासांवर मतदान येऊन ठेपल्याने उमेदवारांची घालमेल वाढली आहे. निवडणूक प्रचारातील बरे-वाईट अनुभव गाठीशी ठेवून ऐनवेळी आपल्या पक्षाच्या उमेदवाराला सोडून विरोधी पक्षातील सबळ उमेदवारांना बरोबर घेऊन पॅनल चालविण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. अखेरच्या टप्प्यात अशाप्रकारच्या नाट्यमय घडामोडींनी राजकीय वातावरण गाजत आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होत आहे. या आधी म्हणजे २००२ मध्ये तीन सदस्यीय पद्धती अस्तित्वात होती. त्यानंतर गेल्यावेळी द्विसदस्यीय प्रभाग  होते आणि आता थेट चार  सदस्यीय प्रभाग पद्धती अस्तित्वात आली आहे.  त्यामुळे कोणा एका उमेदवाराच्या भरवशावर निवडणूक लढविणे सोपे नाही, इतके मोठे भौगोलिक प्रभाग आहेत. चार भागातील चार प्रभाव टाकणारे उमेदवार मिळत नसल्याने एका माजी महापौरासह अनेकांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना समतोल साधण्याचा प्रयत्न केला असला तरी संबंधित सर्वच उमेदवार सक्षम आहेत, अशी स्थिती नाही.  गेल्या आठ ते दहा दिवसांच्या प्रचारात सर्वच पक्षांतील उमेदवारांना आपल्या आणि आपल्याबरोबरच असलेल्या सहकारी उमेदवारांच्या ताकदीचा अंदाज आला आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी कमकुवत साथीदारांना सोडून जो तो आपल्या पद्धतीने खेळी करत असून प्रसंगी विरोधी पक्षांतील उमेदवार आणि आणि अपक्षांशी पॅनल तयार केले आहे. त्यामुळे उमेदवारांचा आपसातच रोष वाढू लागला आहे. निवडणुकीत ज्या पक्षाचा उमेदवार सोयीचा त्याला बरोबर घेण्यामुळे राजकीय परिमाणे बदलणार आहेत. महापालिका निवडणुकीत नाशिकमध्ये अशाप्रकारे ऐनवेळी विरोधी पक्षांच्या पॅनलमधील उमेदवाराला हाताशी घेण्याचे प्रकार नवीन नाहीत. गेल्या निवडणुकीत असे प्रकार घडले होते आणि निवडणुकीत पराभूत झालेल्या काही पक्षीय उमेदवारांनी त्यावर वाच्यताही केली होती, त्यामुळे निवडणुकीतील धुसफूस निकालानंतरच बाहेर पडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)