शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
4
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
5
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
6
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
7
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
10
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
11
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
12
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
13
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
14
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
15
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
16
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
17
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
18
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
19
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
20
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!

तोतया पोलिसांनी लुटले ८० हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:20 IST

साकोरा : पोलीस असल्याचे सांगत भररस्त्यात झडती घेण्याचा बहाणा करून रोख ८० हजार रुपयांची रोकड लुटणाऱ्या दोन संशयितांना नांदगाव ...

साकोरा : पोलीस असल्याचे सांगत भररस्त्यात झडती घेण्याचा बहाणा करून रोख ८० हजार रुपयांची रोकड लुटणाऱ्या दोन संशयितांना नांदगाव पोलिसांनी पाठलाग करून अटक केली.

अटकेतील दोघे संशयित भिवंडी येथील असून अन्य दोन साथीदार रोकड घेऊन फरार झाले आहेत. हा प्रकार मंगळवारी (दि.७) भरदुपारी नांदगाव - औरंगाबाद रस्त्यावरील म्हसोबा बारीत घडला. मात्र चार पैकी दोघे संशयित रक्कम घेऊन फरार केले, की फरार झाले याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

याबाबत माहीती अशी की, मेंढपाळ व्यावसायिक सुरेश चव्हाण हे औरंगाबाद रोडवर मेंढ्या चारत असतांनाच चार अनोळखी व्यक्ती दोन मोटारसायकलवरून जवळ आले. त्यांनी पोलीस असल्याचे सांगून तुझी झडती घ्यायची आहे असे सांगितले. बळजबरीने चव्हाण यांच्या खिशात हात घालून ८० हजार रूपये काढून घेत पोबारा केला. त्यानंतर चव्हाण यांनी त्यांचा मुलगा आकाश याला घटनेची माहीती देताच आकाशने दुचाकींचा पाठलाग करत रेल्वे बोगद्याजवळ या संशयितांना आडविण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयितांनी चाॅपरचा धाक दाखवून पळ काढला.

याबाबत पोलिसांना माहिती मिळताच नाकाबंदी करत मनमाड रोडवर क्रांतीनगर भागात संशयितांना घेरले, मात्र या चौघांनी दुचाकी सोडून शेतातील उभ्या पिकांच्या आसरा घेत पलायन केले. त्या नंतर पोलिसांनी उपस्थित नागरिकांच्या मदतीने पाठलाग करून अमजद अली बरकतअली बेग व बरकत सैफ उरला जाफरी या दोघांना पकडले, मात्र इतर दोघे फरार झाले.

पकडलेले संशयित भिवंडी शहरातील असून पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याजवळील दोन मोटारसायकली जप्त केलेल्या आहेत. मात्र इतर दोघे रक्कम घेऊन पायी कसे काय फरार झाले, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.