शहरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस संशयित अजित बाबासाहेब बनसोडे (रा. साकोरी, ता. राहता. जि. अहमदनगर) याने काही दिवसांपूर्वी शहरातून पळवून नेत १७ जुलै ते २९ ऑगस्ट यादरम्यान वेळोवेळी तिचा विनयभंग करून तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी अत्याचार केला. तसेच निर्मला बाबासाहेब बनसोडे व बाबासाहेब बनसोड (दोघे रा. साकोरी) यांच्याकडून पीडित मुलीला व तिच्या नातेवाइकांना धमकावण्यात येत होते. पीडित मुलीने सर्व हकीकत तिची आई व आजी यांना कळविल्यानंतर त्यांनी ३ सप्टेंबरला लोणी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार सदर गुन्ह्याची कागदपत्रे पोलीस अधीक्षक यांच्याकडून सिन्नर पोलीस ठाण्यास प्राप्त झाल्याने तिघा संशयितांवर बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी करत आहेत.
अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:17 IST