शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासक्रमात ‘जीएसटी’ विषय?

By admin | Updated: July 13, 2017 00:52 IST

चाचपणी : यूजीसी करणार तज्ज्ञांशी चर्चा; वाणिज्य शाखेत समावेश

संदीप भालेराव । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : देशात एकच कर प्रणाली असावी यासाठी जीएसटी लागू करण्यात आल्यानंतर या करप्रणालीविषयी सर्वसामान्यांमध्येच नव्हे तर अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञांमध्ये संभ्रमावस्था आहे. देशाने जीएसटी स्वीकारल्यानंतर त्यामध्ये साक्षरता यावी, यासाठी आता वाणिज्य अभ्यासक्रमातच जीएसटी विषय समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे समजते. यासाठी यूजीसी या क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच काही विद्यापीठांशी चर्चा करणार आहे. राज्य आणि देशाच्या आर्थिक विकासात आणि व्यवसायवृद्धीच्या दृष्टीने जीएसटी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. जीएसटी हा देशाचा एक महत्त्वाचा निर्णय असल्याने आणि सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर सर्वत्र जीएसटी लागू झाला आहे. काळानुरूप जशी परिस्थिती समोर येईल त्याप्रमाणे जीएसटी प्रणालीतदेखील घडामोडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यामध्ये साक्षरता वाढावी आणि देशातील जनतेला विश्वास वाटावा यासाठी केंद्राच्या मदतीने अभ्यासक्रमात जीएसटी विषय समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे.विशेषत: वाणिज्य शाखेत कंपन्या, व्यवसाय आणि त्या अनुषंगाने कराराचा अभ्यास विद्यार्थ्यांना पाच समेस्टर मध्ये शिकविला जातो. त्यातील एका सेमिस्टरमध्ये आता जीएसटी याविषयावर अभ्यासक्रम का असू नये, असा निर्णय दिल्ली विश्वविद्यालयाने घेतल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगानेदेखील याबाबत चाचपणी सुरू केली आहे. यासंदर्भात प्राथमिक पातळीवर निव्वळ चर्चा सुरू असून, प्रत्यक्षात हा अभ्यासक्रम कधी लागू होऊ शकेल याबाबतची कोणतीही स्पष्टता नाही; मात्र भविष्यात सदर विषय अभ्यासक्रमात नक्की येऊ शकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. कर प्रणालीत शिकविणार धडाअभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या कर प्रणालीच्या अभ्यासक्रमात आता हा विषय येऊ शकतो; मात्र हा विषय ऐच्छिक असेल की सक्तीचा हे अद्याप निश्चित नाही. कला शाखेतही ऐच्छिक विषय म्हणून जीएसटी समाविष्ट करण्याबाबतचीही चर्चा झाल्याचे समजते.