लस घेण्यासाठी सिडको भागातील महिला व नागरिक महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर सकाळपासून रांगेत उभे राहत असल्याचे चित्र आजही कायम आहे; परंतु अनेकदा लसीचा डोस अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने अनेक नागरिकांना रांगेत उभे राहूनही लस मिळणे शक्य होत नाही. लसीकरण केंद्रांवर नियोजन करणाऱ्यांकडून जे नागरिक पहाटेपासून रांगा लावतात अशांना टोकन तर काही केंद्रांवर रजिस्टरमध्ये नाव लिहून घेतले जात आहे. यामुळे जितके डोस उपलब्ध आहेत तेवढ्याच लोकांना रांगेत उभे राहावे लागते. इतर नागरिकांना मात्र लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. यामुळे अनेक नागरिक सकाळपासून रांगा लावून उभे राहिले तरी लस उपलब्ध नसल्याने त्यांना लाभ घेण्यासाठी पुन्हा लसीकरण केंद्रावर जावे लागत आहे. शनिवारी सिडकोतील गणेश चौक, हेडगेवार चौक, मोरवाडी, अचानक चौक, अंबड भाग आदी ठिकाणी लस उपलब्ध होती.
कोट====
हेडगेवार चौक येथील मनपा केंद्रावर सकाळपासूनच नागरिक लस घेण्यासाठी येतात. मात्र लसचा साठा जितका उपलब्ध आहे त्यानुसारच नागरिकांची नावनोंदणी केली जाते; परंतु यानंतर अनेक नागरिक आलेले असतात त्यांना लस देऊ शकत नाही. त्यामुळे महापालिकेने अधिक प्रमाणात व नियमित लस उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
-भाग्यश्री ढोमसे, नगरसेविका