शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय बांधकामाची पाहणी

By admin | Updated: February 16, 2017 22:53 IST

गेटस् फाउंडेशन : अमेरिकन पाहुण्यांचा सिन्नरला फेरफटका

सिन्नर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत सिन्नर शहरात सुरू असलेल्या शौचालय बांधकामांची अमेरिकेतील बिल अ‍ॅण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. स्वच्छ भारत अभियानातून उभे केलेले काम आणि भविष्यासाठीचे नियोजन याबद्दल अमेरिकन पाहुण्यांनी सिन्नर नगरपालिकेचे कौतुक केले. गेट्स फाउंडेशनचे चार अधिकारी व सीईपीटी विद्यापीठाच्या पीएएस प्रकल्पाचे आसिम मन्सुरी, धु्रव भावसार, ओंकार काणे हे गुरुवारी सकाळी दहा वाजता सिन्नर नगरपालिका कार्यालयात दाखल झाले. मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, आरोग्य निरीक्षक रवि देशमुख यांच्यासह नगरसेवकांशी त्यांनी चर्चा केली. यावेळी मन्सुरी यांनी सिन्नर नगरपालिकेने स्वच्छ भारत अभियानात आत्तापर्यंत केलेल्या कामाची पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली. नगरपालिका हद्दीत स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या अनुदानातून ९३५ लाभार्थींनी शौचालयाचे काम पूर्ण केले असून, १५० नवीन शौचालयांचे बांधकाम सुरू आहे. गेट्स फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांनी आंबेडकरनगर, गोंदेश्वर मंदिरासह शहरातील अनेक भागात अधिकाऱ्यांनी सुरू असलेल्या शौचालयाच्या कामाची भेट देऊन पाहणी केली. स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी लावलेले फलक, घनकचरा व्यवस्थापन, फिरती शौचालये या कामांसह भविष्यासाठी केलेले नियोजन याबाबत गेट्स फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. (वार्ताहर)