शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपात उमेदवारीवरून आज पुन्हा घमासान

By admin | Updated: February 1, 2017 00:47 IST

प्रतिष्ठेचा प्रश्न : पहिली यादी घोषित होणार

नाशिक : पक्षाचे आमदार आणि काही प्रदेश पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रतिष्ठेच्या प्रश्नामुळे भाजपाची यादी रखडली. त्यातच पालकमंत्री गिरीश महाजन यांना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जळगावला जावे लागल्याने या पक्षाची उमेदवारी रखडली असून, अद्याप उमेदवारच घोषित करण्यात आले नाही. त्यामुळे माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणराय कोणालाच पावला नाही. आता बुधवारी महाजन यांच्या उपस्थितीत पुन्हा सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक होत असून, त्या उमेदवारीवरून घमासान रंगण्याची शक्यता आहे. भाजपाच्या वतीने बुधवारीच पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याचे पक्षातर्फे अधिकृतरीत्या कळविण्यात आले आहे.  भाजपाच्या उमेदवारीसाठी सुमारे सातशे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्यानंतर २७ तारखेला पहिली यादी घोषित होईल, असे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी सांगितले होते, मात्र अद्याप यादी घोषित नाही. यादीसंदर्भात सोमवारी रात्री पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत एक बैठक महाजन यांच्या निवासस्थानी म्हणजेच सिटी सेंटर मॉल परिसरातील एका ठिकाणी घेण्यात आली. त्यात सर्वच पदाधिकारी आपापल्या समर्थकांसाठी अडून राहिल्याने कोणताही निर्णय होऊ शकला नाही. काही ठिकाणी प्रवेश घेणाऱ्या विद्यमान नगरसेवक किंवा अन्य दावेदारांना शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप तसेच अन्य काही आमदारांनी शब्द दिले असून, अशावेळी उमेदवारीसाठी स्पर्धा वाढल्याचे वृत्त आहे. पंचवटीतील प्रभागात प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांच्या मातोश्री भिकूबाई बागुल उमेदवारी करीत असून, त्या प्रभागात दामोदर मानकर यांना उमेदवारीसाठी सानप यांचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते. मात्र मखमलाबाद येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना भेट देऊन गावातील वेगळा उमेदवार देण्याची मागणी केली आहे. त्यातून पेच निर्माण झाला आहे. पंचवटीत उत्तम उगले आणि जगदीश पाटील यांच्यातही असाच पेच निर्माण झाला आहे. सिडको- सातपूर विभागात तर आमदार सीमा हिरे आणि आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी आपापल्या कार्यकर्त्यांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न केला आहे. त्यामुळे या दोन विभागांमध्ये अधिकच गोंधळ आहे. पश्चिम प्रभागात प्रभाग १२ मध्ये गिरीश पालवे, सुरेश पाटील आणि हेमंत धात्रक यांचा तिढा सुटलेला नाही, तर प्रभाग १३ मध्ये पक्षाकडे राखीव गटात सक्षम उमेदवार नाही. प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार वसंत गीते आणि सुनील बागुल यांच्या समवेत अनेकांनी पक्षप्रवेश केला असून, तेदेखील अशाच काही जागांसाठी प्रयत्न करीत आहे. प्र्रभाग क्रमांक सातमध्ये माजी नगरसेवक मधुकर हिंगमिरे व आमदार सीमा हिरे यांचे दीर योगेश हिरे तसेच महिला कार्यकर्त्यांत रस्सीखेच सुरू आहे. सातपूरच्या प्रभाग क्रमांक ८ मध्ये पक्षामध्ये नवा आणि जुना असा वाद सुरू आहे. प्रभाग ३१ मध्ये महिला उमेदवार कोण, यावरून आमदारव्दयींमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. मंगळवारी पालकमंत्री गिरीश महाजन हे आपल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचे उमेदवार ठरविण्यासाठी गेल्याने इच्छुकांचा मंगळवारचा दिवस वाया गेला आता. आता बुधवारी महाजन नाशिकमध्ये येणार  असून त्यांच्या उपस्थितीत सहमती केली  जाणार आहे. (प्रतिनिधी)