शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ जागेसाठी आज फेरमतमोजणी

By admin | Updated: April 7, 2017 02:12 IST

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीत बी. जी. वाघ यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे फेरमतमोजणीसाठी अर्ज दाखल केला आहे

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीत ग्रंथमित्र पॅनलचे उमेदवार बी. जी. वाघ आणि जनस्थान पॅनलचे उमेदवार धनंजय बेळे यांच्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत जनस्थान पॅनलचे उमेदवार धनंजय बेळे यांनी वाघ यांचा अवघ्या एका मताने पराभव केल्यानंतर बी. जी. वाघ यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे फेरमतमोजणीसाठी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या अर्जानुसार शुक्रवारी (दि. ७) सकाळी ११.३० वाजता फेरमतमोजणी प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांनी दिली.शुक्रवारी वाचनालयाच्या मिटिंग हॉलमध्ये दोन्ही उमेदवार आणि पॅनलचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी आणि चार ते पाच निवडणूक कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत फेरमतमोजणी करण्यात येणार आहे. दरम्यान फेरमतमोजणीच्या पूर्वसंध्येला सार्वजनिक वाचनालयाचा परिसर पुन्हा उमेदवारांच्या चर्चा आणि किरकोळ वादाने गजबजला. जनस्थान पॅनलचे एकमेव विजयी उमेदवार धनंजय बेळे यांनी फेरमतमोजणी प्रक्रियेविषयी आक्षेप घेत ही फेरमतमोजणी प्रक्रिया चुकीची असल्याचे पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले. बेळे यांनी सादर केलेल्या या अर्जामुळे ही निवडणूक प्रक्रिया पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.भालचंद्र वाघ आणि धनंजय बेळे यांनी कार्यकारिणी मंडळ सदस्य पदासाठी निवडणूक लढविली होती. त्यामुळे कार्यकारिणी मंडळ सदस्य पदासाठी तयार करण्यात आलेल्या मतपत्रिकांची फेरमतमोजणी होणार आहे. फेरमतमोजणीसाठी अर्ज दाखल केलेले ग्रंथमित्र पॅनलचे उमेदवार भालचंद्र वाघ आणि जनस्थान पॅनलचे उमेदवार धनंजय बेळे यांना शुक्रवारी होणाऱ्या फेरमतमोजणी प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याचे पत्र देण्यात आले होते, परंतु जनस्थान पॅनलचे उमेदवार धनंजय बेळे यांनी फेरमतमोजणीसाठी उपस्थित राहण्याचे पत्र स्वीकारण्यास नकार दिला आणि गुरुवारी संध्याकाळी फेरमतमोजणी प्रक्रिया चुकीची असल्याचा अर्ज निवडणूक अधिकायांकडे सुपूर्द केला.फेरमतमोजणी प्रक्रियेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर ग्रंथमित्र पॅनलचे उमेदवार भालचंद्र वाघ यांना पाच हजार रुपये शुल्क भरावे लागणार असून, यासाठी वाघ यांना शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. धनंजय बेळे यांनी फेरमतमोजणी करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा अर्ज दाखल केला नसला तरी त्यांना या प्रक्रियेत सहभागी व्हावे लागणार आहे, अशी माहिती भणगे यांनी दिली. शुक्रवारी (दि. ७) सकाळी ११ वाजेपर्यंत फेरमतमोजणीसाठी अर्ज करणारे उमेदवार भालचंद्र वाघ यांनी फेरमतमोजणीसाठी निर्धारित केलेले शुल्क अदा केले नाही, तर फेरमतमोजणीची प्रक्रिया आपोआप रद्द होईल आणि पूर्वीचाच निकाल ग्राह्य धरण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी रविवारी (दि. २) मतदान घेण्यात आले आणि सोमवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या निकालानंतर १८ पैकी १७ जागांवर ग्रंथमित्र पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले होते. या निवडणुक ीत जनस्थान पॅनलचे एकमेव उमेदवार धनंजय बेळे हे विजयी झाले. बेळे यांना या निवडणुकीत ८९५ तर वाघ यांना ८९४ मते मिळाली आहेत. भालचंद्र वाघ यांनी या निकालाला आव्हान दिल्याने फेरमतमोजणीनंतर वाघ विजयी होतात की बेळेंचा निकाल कायम राहतो, हे बघणे औत्सुक्याचे ठरले आहे. (प्रतिनिधी)