शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 01:50 IST

जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी सोमवारीच मतदान केंद्रांवर साहित्य रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, निवडणूक होणाºया ग्रामपंचायतीच्या हद्दीत नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून जिल्हाधिकाºयांनी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे.

नाशिक : जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी सोमवारीच मतदान केंद्रांवर साहित्य रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, निवडणूक होणाºया ग्रामपंचायतीच्या हद्दीत नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून जिल्हाधिकाºयांनी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी महिन्यातच या निवडणुकांची घोषणा केली होती. मार्च ते मे यादरम्यान मुदत संपणाºया सर्व ग्रामपंचायती तसेच रिक्त जागा असलेल्या ग्रामपंचायतींच्या  पोटनिवडणुका घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्णातील पंधराही तालुक्यांत २८३ ग्रामपंचायतींतील ४९५ रिक्त जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु त्यातील बहुतांशी जागा अनुसूचित जमाती महिला वर्गाच्या असल्यामुळे व त्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेक जागांवर नामांकनच दाखल करण्यात आले नाही. इगतपुरी तालुक्यातील टाकेद ग्रामपंचायतीसाठी फक्त तीन जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, तेथील सरपंचपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव असल्यामुळे सरपंचपदासाठी नामांकन दाखल होऊ शकले नाही. त्यामुळे आता माघारीनंतर नऊ तालुक्यांतील ३७ ग्रामपंचायतींच्या ४६ प्रभागांतील ५१ जागांसाठी निवडणूक होणार आहे. मंगळवारी सकाळी सा डेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ५० मतदान केंद्रांवर मतदान होईल त्यासाठी २५० अधिकारी, कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बुधवारी मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत