लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्यातील गटसचिवांच्या मागण्यांवर सहकारमंत्र्यांच्या दालनात चर्चा निष्फळ ठरल्याने मंगळवारी (दि. १८) राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष देवीदास नाठे यांनी दिली.कृषी कर्जमाफीचे कोणतेही काम गटसचिवांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तसेच शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण विकासासाठी योगदान देणाऱ्या गटसचिवांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. गटसचिवांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने २७ जूनपासून असहकार आंदोलन पुकारले होते. त्यावर ५ जुलैला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची झालेली चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे १८ जुलैला राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय गटसचिव संघटनेने घेतला आहे.
गटसचिव संघटनेचे आज धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:32 IST