शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

आज घरोघरी लक्ष्मीपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 00:49 IST

दीपोत्सव : व्यापारीवर्गाच्या नववर्षास सुरुवात; बाजारात खरेदीचा उत्साह नाशिक : अंधारातून प्रकाशाकडे नेणाºया दिवाळीतील प्रत्येक सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुवारी (दि. १९) दीपावलीतील महत्त्वाचा लक्ष्मीपूजनाचा दिवस असून, बुधवारी शहरातील बाजारपेठेत पूजा साहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

सुख-समृद्धीची उधळण करीत हर्षोल्हास घेऊन आलेल्या दीपपर्वाने सर्वत्र आनंदाची बरसात होत असून, आकाशदीपांच्या रंगलहरींनी आंगण उजळून निघाले आहे. लक्ष्मीच्या स्वागतासाठी लक्ष, लक्ष दीपांच्या लखलखत्या प्रकाशाने दीपोत्सव तेजोमय करणाºया या सुवासिनी.

दीपोत्सव : व्यापारीवर्गाच्या नववर्षास सुरुवात; बाजारात खरेदीचा उत्साह

नाशिक : अंधारातून प्रकाशाकडे नेणाºया दिवाळीतील प्रत्येक सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुवारी (दि. १९) दीपावलीतील महत्त्वाचा लक्ष्मीपूजनाचा दिवस असून, बुधवारी शहरातील बाजारपेठेत पूजा साहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.लक्ष्मीपूजनाच्या पूजेसाठी लागणारी केरसुणी, साळीच्या लाह्या, झेंडूची फुले, पाच प्रकारची फळे, ऊस, विड्याची पाने, मातीच्या लक्ष्मीची मूर्ती, लक्ष्मीचे फोटो आदी वस्तूंची खरेदी करण्यासाठी महिलावर्गाची बाजारपेठेत गर्दी झाली होती. महालक्ष्मीला आवडणारी कमळाची फुलेदेखील पंचवटीतील फूल बाजार तसेच रविवार कारंजा परिसरात विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाºयांना आपल्या संस्थांकडून महागाई भत्ता, सानुग्रह अनुदान भरघोस प्रमाणात मिळाल्याने कामगारवर्गाने नवीन वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य दिले. रेडिमेड कपड्यांसह साड्यांची दुकाने तसेच मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीच्या दुकानांमध्ये चोखंदळ ग्राहक वस्तू खरेदी करताना दिसत होते.व्यापारीवर्गाचे लक्ष्मीपूजनापासून नवीन वर्ष सुरू होत असल्याने रोजमेळ, खतावणी, चोपड्या, रोजकीर्दमध्ये व्यापारी नोंदी करण्यास सुरुवात करणार आहेत. लक्ष्मीपूजनाला पहाटे लवक र उठून अभ्यंगस्नान करण्यात येते आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताची योग्य वेळ साधून पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात येणार आहे. दिवाळीच्या दिवशी यश, कीर्ती आणि धनलाभाची कामना करत महालक्ष्मीची पूजा करण्यात येते. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीसोबतच भगवान गणेश, विष्णू आणि कुबेराची पूजा करण्याचा प्रघात आहे. गुरुवारी (दि. १९) लक्ष्मीपूजन झाल्यानंतर शुक्रवारी (दि.२०) बलिप्रतिपदा आणि शनिवारी (दि. २१) भाऊबीज साजरी केली जाणार आहे.लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असल्याने यावेळी सोने, चांदी आणि मोत्यांचे दागिने, चांदी तसेच सोन्याची नाणी, रोख पैसे आदींची पूजा करण्यात येते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झेंडू, शेवंतीच्या फुलांचे तोरण दरवाजावर लावण्यात येते.आपल्या वाहनांनाही झेंडूच्या फुलांचा हार घालण्यात येतो. लक्ष्मीपूजनानंतर रात्री आकाशकंदील, पणत्या प्रज्वलित करून आसमंतात फटाक्यांची आतषबाजी करत लक्ष्मीपूजनाचा सण उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.लक्ष्मीपूजनासाठी मुहूर्तशुभ : सकाळी ६.३२ ते ७.५९लाभ : दुपारी १२.२० ते ०१.४७अमृत : दुपारी ०१.४७ ते ३.१४शुभ : दुपारी ४.४१ ते सायंकाळी ६.०८अमृत : सायंकाळी ६.०८ ते ७.४१