नाशिक : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदासाठी उद्या शनिवारी (दि. ४) निवडणूक होणार असून, त्यादृष्टीने हालचालींना वेग आला आहे. सभापतिपदाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादीने भाजपा-कॉँग्रेस-शिवसेना पक्षांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. कॉँग्रेसने मात्र तटस्थच राहण्याची मानसिकता बनविली असून, गरज भासल्यास राष्ट्रवादीसोबत किंवा विरोधात निवडणूक लढविण्याचीही तयारी केली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसने काल सायंकाळी उशिरा सदस्यांची बैठक बोलावली होती. त्यात नेमके किती सदस्य उपस्थित होते, हे समजू शकले नाही.शनिवारी ४ आॅक्टोबरला जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी निवडणूक होणार आहे. मागे ऐनवेळी राष्ट्रवादीने उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवून कॉँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केल्याने कॉँग्रेसचे सदस्य दुखावले आहेत.
विषय समिती सभापतिपदासाठी आज निवडणूक
By admin | Updated: October 3, 2014 23:03 IST