शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

मालेगाव महापौर, उपमहापौरांची आज निवड

By admin | Updated: June 13, 2017 23:52 IST

मालेगाव महापौर, उपमहापौरांची आज निवड

लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव : महापालिकेची महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक बुधवारी (दि. १४) होत आहे. सकाळी ११ वाजता महापालिकेच्या सभागृहात जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेत महापौर, उपमहापौरांची निवड केली जाणार आहे. महापालिका निवडणुकीत कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे महापौर, उपमहापौर निवडणूक चुरशीची होऊन चमत्कार घडण्याची शक्यता आहे. सत्तास्थापनेसाठी सभागृहात ऐनवेळी नवीन युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापौरपदासाठी काँग्रेस व सेना एकत्रित आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, भाजपानेही सत्ता खेचून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. या निवडणुकीत एमआयएमची भूमिका निर्णायक ठरणार आहे. महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली.सभागृहात बहुमतासाठी ४३ सदस्यांची आवश्यकता आहे. निवडणुकीत अशा स्थितीत महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी कॉँग्रेस व राष्ट्रवादी-जनता दल आघाडीमध्ये चढाओढ लागली होती. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-जनता दलासोबत जाईल, असे प्रारंभी दिसत होते; मात्र ऐनवेळी शिवसेनेने काँग्रेसशी बोलणी करून काँग्रेसला महापौर पदासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. यामुळे राष्ट्रवादी व जनता दलाचे पदाधिकारी व नगरसेवक सत्ता स्थापनेसाठी ईर्षेला पेटले आहेत. भाजपानेही यंदा जोरदार मुसंडी मारली आहे. ९ नगरसेवक निवडून आल्यानंतर सत्तेत वाटा मिळविण्यासाठी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी व जनता दलासोबत जाऊन सत्तेत सहभागी होण्याचा भाजपा नगरसेवकांचा मनोदय आहे.

कॉँग्रेसला २८,

राष्ट्रवादी कॉँग्रेस - जनता दल आघाडीला २७,

शिवसेना १३,

भाजपा ९

व एमआयएमला ७ जागा मिळाल्या.