शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

मर्चंट बॅँकेची आज मतमोजणी ;  तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:58 IST

नाशिक : जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक मर्चंट बँकेची मतमोजणी बुधवारी (दि.२६) सिडकोतील संभाजी इनडोअर स्टेडिअम येथे करण्यात येणार ...

नाशिक : जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक मर्चंट बँकेची मतमोजणी बुधवारी (दि.२६) सिडकोतील संभाजी इनडोअर स्टेडिअम येथे करण्यात येणार असून, मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. सायंकाळपर्यंत या निवडणुकीचा कल येण्याचा अंदाज आहे.गेल्या महिनाभरापासून जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात गाजत असलेल्या व दहा वर्षांनंतर संचालक मंडळाची निवडणूक होत असलेल्या मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीची घोषणा होताच इच्छुकांची धावपळ उडाली होती.  पॅनल निर्मितीच्या हालचाली व त्यात समावेश होण्यासाठी केली जाणारी लॉबिंग, प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल व त्यानंतर माघारीसाठी करण्यात आलेली मनधरणी पाहता, खऱ्या अर्थाने निवडणूक गाजली होती. पावणे दोन लाख मतदार व ८२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने ही निवडणूक चुरशीची झाली. त्यासाठी रविवारी जिल्ह्णात मतदान झाले असता, बॅँकेच्या एकूण १ लाख ७६ हजार २६२ मतदारांपैकी ६३ हजार ८३९ मतदारांनी म्हणजे सुमारे ३६ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीची मतमोजणी सिडकोतील संभाजी इनडोअर स्टेडिअम येथे बुधवारी सकाळी आठ वाजेपासून करण्यात येणार असून, मतमोजणीसाठी १०४ टेबलवर ५०० कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे. सर्वप्रथम प्रत्येक मतपेटीतील मतांची खात्री करण्यात येणार असून, नंतर सर्व मतपत्रिका एकत्र करून त्याचे गठ्ठे तयार केले जातील. त्याचवेळी वैध-अवैध मतांची विभागणी केली जाईल. अगोदर सर्वसाधारण गटातील उमेदवारांची मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे. या गटात तीन फेºया होणार आहेत. दुसºया फेरीनंतर मतदारांचा कल लक्षात येईल, असा अंदाज आहे. सकाळी आठ वाजता सुरू झालेली मतमोजणी रात्री आठ वाजता थांबविण्यात येईल. उर्वरित मोजणी दुसºया दिवशी म्हणजेच गुरुवारी दि.२७ डिसेंबर रोजी पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर महिला व मागासवर्गीय उमेदवारांची मतमोजणी करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद भालेराव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दिगंबर हौसरे यांनी दिली. मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी संभाजी स्टेडिअमला पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

टॅग्स :Electionनिवडणूकbankबँक