शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून मतदानवाढीचेही बिजारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 01:02 IST

राज्यात १ जुलैपासून राबविण्यात येणाऱ्या वृक्षारोपण मोहिमेचे औचित्य साधून समाजामध्ये मतदान जागृतीचेदेखील बिजारोपण केले जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान जनजागृती मोहिमेवर भर दिला जाणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली.

नाशिक : राज्यात १ जुलैपासून राबविण्यात येणाऱ्या वृक्षारोपण मोहिमेचे औचित्य साधून समाजामध्ये मतदान जागृतीचेदेखील बिजारोपण केले जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान जनजागृती मोहिमेवर भर दिला जाणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाच्या कार्यालयात उपजिल्हा निवडणूक अधिकारी आनंदकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस निवडणूक विभागाचे तहसीलदार प्रशांत पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वैशाली झनकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नितीन महाजन, मनपाचे शिक्षणाधिकारी देवीदास महाजन आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात मतदानाच्या टक्केवारी मध्ये काही प्रमाणात वाढ झाली असली तरी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हाभर जनजागृती करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या मतदान केंद्रांवर सर्वाधिक मतदान झाले, अशा मतदान केंद्रांच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच सर्वाधिक मतदान झालेल्या मतदान केंद्रांचा अभ्यास करून त्यानुसार इतर मतदान केंद्रांवर मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करावी आणि याबाबत काही अडचण असल्यास आपल्या परिसरातील मतदान केंद्राच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ यांच्याकडे संपर्क साधावा, असे अवाहन यावेळी करण्यात आले. मयत व दुबार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची मोहीम सध्या जिल्हाभर वेगाने सुरू आहे़पथनाट्ये, रॅलीद्वारेही जनजागृतीशाळा, महाविद्यालयांत विविध कार्यक्र माद्वारे मतदारांमध्ये लोकशाही व मतदानाचे महत्त्व याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे व मतदान वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. पथनाट्ये, रॅलीद्वारे मतदार जागृती मोहीम घेण्यात येणार असून, भारत निवडणूक आयोग, दिल्ली यांच्या निर्देशानुसार दिव्यांग मतदारांच्यासोयी-सुविधा याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय