शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

आज होणार लक्ष्मीपूजन

By admin | Updated: October 30, 2016 01:26 IST

जय्यत तयारी : सुख-समृद्धीसाठी करणार प्रार्थना

नाशिक : अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणून दिवाळीतील प्रत्येक सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रविवारी (दि. ३०) दीपावलीतील महत्त्वाचा लक्ष्मीपूजनाचा दिवस असून, शनिवारी शहरातील बाजारपेठेत पूजनाच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.  रविवारी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजऱ्या करण्यात येणाऱ्या लक्ष्मीपूजनाच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होती. लक्ष्मीपूजनाच्या पूजेसाठी लागणारी केरसुणी, साळीच्या लाह्या, झेंडूची फुले, पाच प्रकारची फळे, ऊस, विड्याची पाने, मातीच्या लक्ष्मीची मूर्ती, लक्ष्मीचे फोटो आदि वस्तुंची खरेदी करण्यासाठी महिलावर्गाची बाजारपेठेत गर्दी झाली होती. व्यापारीवर्गाचे लक्ष्मीपूजना पासून नवीन वर्ष सुरू होत असल्याने रोजमेळ, खतावणी, चोपड्या, व्यापारी नोंदी करण्यास सुरुवात करणार आहेत. लक्ष्मीपूजनाला पहाटे लवक र उठून अभ्यंगस्नान करण्यात येते आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताची योग्य वेळ साधून पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात येणार आहे. लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असल्याने यावेळी सोने, चांदी आणि मोत्यांचे दागिने, चांदी तसेच सोन्याची नाणी, रोख पैसे आदिंची पूजा करण्यात येते.  लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झेंडू, शेवंतीच्या फुलांचे तोरण दरवाजावर लावण्यात येते. (प्रतिनिधी)लक्ष्मीपूजनासाठी मुहूर्तलाभ : सकाळी ९.३० ते १०.५६अमृत : सकाळी १०.५६ ते १२.२२शुभ : दुपारी ०१.४९ ते ३.१५शुभ : संध्याकाळी ०६.०५ ते ०७.४०अमृत : ०७.४० ते ०९. १५