शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आज नशिबाची परीक्षा

By admin | Updated: February 23, 2017 00:25 IST

८२१ उमेदवार : उत्कंठा वाढली, मातब्बरांच्या लढतीकडे लक्ष

नाशिक : महापालिकेत सत्तापरिवर्तन होणार काय, कोणता पक्ष बहुमताचा आकडा गाठणार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, कोणाचे भाग्य उजळणार... यांसारखे नाना प्रश्न नाशिककरांना गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून सतावत असताना त्यांची उत्तरे गुरुवारी (दि.२३) मतमोजणी प्रक्रियेनंतर मिळणार आहेत. त्यामुळे मतमोजणीबाबत उमेदवारांसह सर्वांचीच उत्कंठा वाढली असून, मातब्बरांच्या लढतीकडे लक्ष लागून राहिले आहे.  महापालिका निवडणुकीसाठी यंदा बहुसदस्यीय प्रभाग रचना अस्तित्वात आणली गेली. एकूण ३१ पैकी दोन प्रभागांमधून प्रत्येकी तीन तर उर्वरित २९ प्रभागांमधून प्रत्येकी चार नगरसेवक निवडून देण्याची जबाबदारी नाशिककरांवर सोपविण्यात आली. त्यानुसार, मंगळवारी (दि. २१) मतदान घेण्यात येऊन मतदानाची टक्केवारी ६१.६० टक्के नोंदली गेली. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा सुमारे पाच टक्क्यांनी मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली. त्यामुळे निकालाबाबत राजकीय तज्ज्ञही संभ्रमित आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. शिवसेना, भाजपा, मनसे, कॉँग्रेस, राष्ट्रवादी, माकपा, बसपा, सपा यांसह छोट्या राजकीय पक्षांनी निवडणुकीत आपली सारी ताकद पणाला लावत चुरस निर्माण केली. उद्धव ठाकरे, राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभांवरूनही गेल्या काही दिवसांत निकालाबाबत आडाखे बांधले जात आहेत. (प्रतिनिधी)दुपारी ४ वाजेपर्यंत निकाल अपेक्षितमतमोजणीची प्रक्रिया सकाळी १० वाजता सुरू झाल्यानंतर दुपारी ४ वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. पहिल्या तासाभरात प्रामख्याने भाजपाच्या रंजना भानसी, राष्ट्रवादीच्या कविता कर्डक, अपक्ष भगवान भोगे, शिवसेनेचे अजय बोरस्ते, गोकुळ पिंगळे, भाजपाचे योगेश हिरे, कॉँग्रेसचे शाहू खैरे, राष्ट्रवादीचे गजानन शेलार, मनसेच्या सुरेखा भोसले, शिवसेनेचे उमेदवार व माजी महापौर यतिन वाघ, माजी महापौर अशोक दिवे यांचे पुत्र प्रशांत दिवे, शिवसेनेचे शैलेश ढगे, भाजपाच्या संगीता गायकवाड, संभाजी मोरुस्कर, शिवसेनेचे सुधाकर बडगुजर व हर्षा बडगुजर, मनसेचे अनिल मटाले व कांचन पाटील, उत्तम दोंदे, शोभा फडोळ, विलास शिंदे व अमोल पाटील यांचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या सर्व्हेची चर्चामतदानानंतर सोशल मीडियावरून निकालाबाबत वेगवेगळे सर्व्हे फिरत आहेत. त्यामुळे बुधवारी दिवसभर या सर्व्हेत नमूद केलेल्या आकडेवारीचीच चर्चा अधिक रंगली होती. महापालिकेत कुणाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊन काही पक्ष किंगमेकर ठरण्याचीही चर्चा होत होती.