शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
4
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
5
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
6
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
7
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
8
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
9
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
10
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
11
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
12
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
13
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
14
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
15
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
16
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
17
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
18
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
19
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
20
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला

आज ‘मुहर्रम’च्या चंद्रदर्शनाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 01:44 IST

इस्लामी नववर्ष हिजरी सन १४४०ला सोमवारी संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चंद्रदर्शन घडल्यास मुस्लीम बांधवांच्या नववर्षाचा पहिला महिना ‘मुहर्रमुल हराम’ला सुरुवात होईल.

नाशिक : इस्लामी नववर्ष हिजरी सन १४४०ला सोमवारी संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चंद्रदर्शन घडल्यास मुस्लीम बांधवांच्या नववर्षाचा पहिला महिना ‘मुहर्रमुल हराम’ला सुरुवात होईल. मुहर्रमनिमित्त मुस्लीमबहुल परिसरात विविध धार्मिक संघटनांच्या वतीने दहा दिवसीय प्रवचनमालांचे आयोजन करण्यात आले आहे.इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचे नातू शहीद-ए-आजम हजरत इमाम-ए-हुसेन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी मुस्लीम बांधव मुहर्रमच्या सुरुवातीच्या दहा दिवसांमध्ये ‘करबला’च्या स्मृतींना उजाळा देतात. इस्लामी कालगणना चंद्रदर्शनावर अवलंबून असल्यामुळे प्रत्येक महिन्याच्या २९ तारखेला चंद्रदर्शन घेऊन महिना बदलला जातो. चंद्रदर्शन न घडल्यास चालू महिन्याचे तीस दिवस पूर्ण करून पुढचा महिना सुरू होतो. मुहर्रमला धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. मुहर्रमच्या दहाव्या दिवशी मुस्लीम बांधवांकडून आशुराचे नमाजपठण व प्रार्थना केली जाते.‘इमामशाही’मध्ये सोहळासारडा सर्कल येथील हजरत सय्यद इमामशहा बाबा यांच्या दर्ग्याच्या आवारात मानाचा अळीवपासून (हालौ) तयार केला जाणारा ताबूत प्रसिद्ध आहे. हा ताबूत तयार करण्यासाठी सय्यद कुटुंबीयांकडून प्रारंभ क रण्यात आला आहे. मुहर्रमच्या नवव्या दिवसापर्यंत या ताबूताला पूर्णत: हिरवळीचा साज चढलेला पहावयास मिळतो. शेवटचे दोन दिवस या ठिकाणी यात्रोत्सव साजरा केला जातो.या महिन्याचा दहावा दिवस ‘आशुरा’ म्हणून पाळला जातो. या दिवशी समाजबांधवांकडून ठिकठिकाणी सामूहिकरीत्या सरबतचे वाटप केले जाते.यावर्षी मुहर्रम आाणि गणेशोत्सव हे दोन्ही सण एकाच कालावधीत साजरे होत असल्याचा दुर्मीळ योग जुळून आला आहे. राष्टÑीय एकात्मता सामाजिक बांधिलकी व जातीय सलोखा कायम जोपासावा असाच संदेश दोन्ही समाजासाठी हा योग देऊन जाणारा आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवदेखील बारा दिवस साजरा होतो आणि मुहर्रमचे सुरुवातीचे दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आणि या कालावधीत करबलाच्या स्मृती जागविल्या जातात. धर्मगुरूंकडून प्रवचनातून त्याबाबत प्रकाश टाकला जातो.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमIslamइस्लाम