शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कळवणच्या प्रथम नगराध्यक्षांच्या नावावर आज शिक्कामोर्तब

By admin | Updated: November 29, 2015 23:00 IST

सोपस्कार : सुनीता कौतिक पगार यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र

 कळवण : नगरपंचायतच्या प्रथम नगराध्यक्षा व प्रथम उपनगराध्यक्षपदाची सोमवारी (दि. ३०) निवडणूक होत असून प्रथम नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता कौतिक पगार यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल असल्याने त्यांच्या निवडीवर सोपस्कार पूर्ण होऊन शिक्कामोर्तब होणार आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर प्रथम उपनगराध्यक्षपदाची निवडणूक होत असल्याने या निवडणुकीनेही कळवणकरांचे लक्ष वेधले आहे.ग्रामपालिकेचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतर १ नोव्हेंबरला नगरपंचायतची पहिली सार्वत्रिक निवडणूक होऊन त्यात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, मविप्र संचालक रवींद्र देवरे, पंचायत समितीचे माजी सभापती कौतिक पगार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ७ जागा काबीज केल्या, तर भाजपा ४, काँग्रेस ३, शिवसेना १ तर दोन जागांवर अपक्ष निवडून आले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पहिल्यापासूनच सत्तास्थापनेचा दावा केला असताना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक सुनीता पगार यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड होणे निश्चित झाले असून राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोमवारी (दि. ३०) शासकीय सोपस्कार पूर्ण करण्यात आल्यानंतर त्यांच्या नगराध्यक्षपदी निवडीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. यानंतर उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असल्याने या पदावर क ोणाची वर्णी लागणार याकडे कळवणकरांचे लक्ष लागले असून सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन निवड केली जाणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. दरम्यान, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहणार असून आघाडीचा धर्म पाळणार असल्याचे सूतोवाच काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने के ले असून, नगराध्यक्षांबरोबरच उपनगराध्यक्षपदाची निवडदेखील बिनविरोध होईल, असे संकेत एका नगरसेवकाने दिले आहे. (वार्ताहर)