शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आज ‘महाराष्ट्र बंद

By admin | Updated: June 5, 2017 01:35 IST

नाशिक : शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसह विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी सोमवारी (दि. ५) राज्यव्यापी बंदची हाक दिली

’ लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी संपामध्ये सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसह विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी सोमवारी (दि. ५) राज्यव्यापी बंदची हाक दिली असून, रविवारी मध्यरात्री १२ वाजेपासून या संपाला सुरुवात होणार आहे. या बंददरम्यान राज्यभरातील शेतकरी त्यांच्या बैलगाड्या, जनावरे आणि संपूर्ण कुटुंबासह रस्त्यावर उतरणार आहेत. तसेच कर्जमुक्तीसह शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत संप मागे न घेण्याचा निर्धारही यावेळी शेतकऱ्यांनी केला. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात किसान क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली. तसेच संपाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीतील सदस्यांची सोमवारच्या बंदनंतर मंगळवारी (दि. ६) मुंबईत बैठक होणार आहे. त्यानंतर संपाची पुढील रणनीती तयार करण्यात येणार आहे. या कालावधीत सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर गुरुवारी (दि. ८) नाशिकमध्ये शेतकऱ्यांची राज्यस्तरीय परिषद घेऊन संप आणखी व्यापक करण्यासंबंधी नियोजन करण्याविषयी यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी व्यासपीठावर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला प्रवेश नाकारून सरकारी पक्षाकडून शेतकरी संप विरोधकांचा डाव  असल्याचा आरोप खोडून काढला. बैठकीला ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ बुधाजीराव मुळीक, डॉ. अजित नवले, राजू देसले, चंद्रकांत बनकर, डॉ. गिरीधर पाटील, हंसराज वडघुले यांच्यासह विविध पदाधिकारी, ा हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, शेतकरी संपादरम्यान अनेक शेतकऱ्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, जर शेतकरी दरोडेखोर असतील तर ते कर्जबाजारी कसे? असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला. पुरोगामी संघटना संपावर ठामशेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला डाव्या व पुरोगामी चळवळीतील संघटनांनी पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास, गोदी व बंदर कामगार सक्रियपणे संपात सामील होतील, असा इशारा ज्येष्ठ कामगार नेते एस. के. शेट्ये यांनी दिला.