नाशिक : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची बुधवारी (दि.१५) तिथीनुसार सर्वत्र जयंती साजरी केली जाणार आहे. यानिमित्त राजांना प्रजेकडून अभिवादन करण्यात येणार असून, शिवजयंतीची शहर व परिसरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.शिवछत्रपतींच्या जयंतीनिमित्त शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून, जय्यत तयारी करण्यात आली आहे. भगवे झेंडे, पताका लावून परिसरात सजावट करण्यात आली आहे. विविध सामाजिक, धार्मिक संघटनांसह मित्रमंडळांचे कार्यकर्ते छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दुपारी चार वाजता वाकडी बारव जुने नाशिक परिसरातून शिवजयंतीच्या पारंपरिक मिरवणुकीला प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती भद्रकाली पोलिसांनी दिली.नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा हा पहिलाच सामाजिक ‘इव्हेंट’ असल्यामुळे प्रत्येक प्रभागात शिवरायांची जयंती जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी करण्याचा नगरसेवकांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. विविध सामाजिक संघटना, मित्रमंडळांच्या वतीने छत्रपतींचे पुतळे आणण्यात आले आहे. शिवरायांचे पोवाडे लिहिलेले गड, किल्ल्यांच्या छायाचित्रांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ छबीसोबत स्थान देण्यात आले आहे.
आज रयतेच्या राजाला प्रजा करणार अभिवादन !
By admin | Updated: March 15, 2017 00:45 IST