शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून पोटनिवडणुकीचा डंका

By admin | Updated: August 2, 2016 01:35 IST

अधिसूचना जारी : ९ आॅगस्टपर्यंत अर्ज स्वीकृती

 नाशिक : नाशिकरोड विभागातील महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३५ (ब) आणि ३६ (ब) या दोन प्रभागांतील रिक्त जागांसाठी येत्या २८ आॅगस्टला पोटनिवडणूक घेण्यात येणार असून, त्याची अधिसूचना मंगळवार, दि. २ आॅगस्ट रोजी जारी करण्यात येणार आहे. त्यानुसार, पोटनिवडणुकीचे ढोल वाजण्यास सुरुवात होणार आहे. दि. २ ते ९ आॅगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील.नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक ३५ (ब) मधील मनसेच्या नगरसेवक शोभना शिंदे आणि प्रभाग ३६ (ब) मधील मनसेचे नगरसेवक नीलेश शेलार यांना पक्षविरोधी मतदान केल्याबद्दल विभागीय आयुक्तांनी मनसेच्या तक्रारीवरून अपात्र घोषित केले होते. दरम्यान, दोन्ही अपात्र नगरसेवकांनी उच्च न्यायालयात धावही घेतली होती, परंतु पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित होईपर्यंत न्यायालयाकडून स्थगिती अथवा कोणताही आदेश प्राप्त झाला नाही. त्यामुळे निवडणूक शाखेकडून दि. २ आॅगस्ट रोजी पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी केली जाणार असून, दोन्ही प्रभागात दि. २८ जुलैच्या मध्यरात्रीपासूनच आचारसंहिता लागू झालेली आहे. पोटनिवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून उपआयुक्त रोहिदास बहिरम यांची नेमणूक करण्यात आली आहे, तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून पश्चिमचे विभागीय अधिकारी नितीन नेर यांची नियुक्ती झाली आहे. याशिवाय, उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची माहिती लेखापरीक्षक गिरीश देशमुख यांच्याकडे राहणार असून, आचारसंहिता कक्षाची जबाबदारी उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती प्रशासन उपायुक्त विजय पगार यांनी दिली. दि. २ ते ८ आॅगस्ट या कालावधीत रोज सकाळी ११ ते ३ या वेळेत नाशिकरोडच्या विभागीय कार्यालयात अर्जविक्री व उमेदवारांची अर्ज स्वीकृती प्रक्रिया राबविली जाणार आहे. दि. ९ आॅगस्ट रोजी सकाळी ११ ते २ या वेळेतच अर्ज दिले जातील. रविवारी सुटीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. महापालिकेने दोन्ही प्रभागांसाठी अंतिम मतदार यादी जाहीर केली असून, प्रभाग ३५ मध्ये १० हजार ५२५ (पुरुष- ५५७२ तर स्त्री- ४९५३) आणि प्रभाग ३६ मध्ये १० हजार ३९१ (पुरुष- ५३७४, स्त्री- ५०१७) याप्रमाणे मतदार आहेत. (प्रतिनिधी)