शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषद मतमोजणीची आज रंगीत तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:29 IST

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणीसाठी प्रशासकीय व्यवस्था पूर्ण करण्यात आली असून, बुधवारी दुपारी या मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे.

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणीसाठी प्रशासकीय व्यवस्था पूर्ण करण्यात आली असून, बुधवारी दुपारी या मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात होऊन दोन तासांत निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सोमवारी जिल्ह्यातील १५ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील ६४४ मतदारांनी शंभर टक्के आपला मतदानाचा हक्क बजावला. सर्व मतपेट्या जिल्हाधिकारी कार्र्यालयातील स्ट्रॉँग रूममध्ये पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने झालेली राजकीय चुरस पाहता निवडणूक निकालाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी अनेक नाट्यमय घटना घडल्याने मतदारांचा कौल नेमका कोणाला मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवसेनेचे नरेंद्र दराडे व राष्टÑवादीचे शिवाजी सहाणे या दोघांमध्येच खरी लढत असल्यामुळे प्रशासनाच्या मते दोन तासांतच मतमोजणी होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत भवन येथे या निवडणुकीची मतमोजणी केली जाणार असून, प्रत्यक्ष ८ वाजता मतमोजणी सुरू होणार असली तरी, मतमोजणी अधिकारी व कर्मचाºयांना सकाळी ६ वाजताच उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.मतमोजणीसाठी दोन टेबल लावण्यात येणार आहे. पसंती क्रमाने उमेदवार निवडून द्यायचा असल्यामुळे प्रारंभी सर्व मतपेट्या मतमोजणीस्थळी आणून त्या त्या मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या व प्रत्यक्ष मतपेटीतील मतांची संख्या मोजून पाहिली जाणार आहे.सर्व मतपत्रिका एका हौदात टाकून त्या सरमिसळ केल्या जातील व प्रत्येकी २५ मतपत्रिकेचे गठ्ठे केले जाणार आहेत. दोन मतमोजणी टेबलवर त्यांचे समान वाटप केल्यानंतर अगोदर वैध, अवैध व संशयित मतपत्रिकांचे विलगीकरण केले जाईल. निवडणूक अधिकारी अंतिम निर्णय घेतील.त्यानंतरच खºया अर्थाने वैध मतांच्या तुलनेने उमेदवाराला निवडून येण्यासाठी कोटा निश्चित करून प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात होणार आहे. या सर्व पद्धतीचा सराव करण्यासाठी बुधवारी दुपारी ३ वाजता सर्व मतमोजणी अधिकारी व कर्मचाºयांना प्रशिक्षण व रंगीत तालीम करून घेण्यात येणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक