शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिजेजुरीत आजपासून यात्रोत्सवास प्रारंभ

By admin | Updated: February 11, 2017 23:43 IST

खोबरे-भंडाऱ्याची उधळण : चार दिवसीय यात्रेत लाखो भाविक लावणार हजेरी

पांगरी / निऱ्हाळे : प्रतिजेजुरी म्हणून लौकिकास पावलेल्या मऱ्हळ येथील खंडेराव महाराज यात्रोत्सवास रविवारपासून (दि. १२) प्रारंभ होत आहे. चार दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात सुमारे लाखभर भाविक ‘येळकोट येळकोट, जय मल्हार’चा जयघोष व खोबरे-भंडाऱ्याची उधळण करीत दर्शनासाठी हजेरी लावतात.  शनिवारी मध्यरात्री पांगरी येथील मानाचा रथ गावात आल्यानंतर यात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने सजविलेला रथ मंदिरासमोर आल्यानंतर खंडेराव महाराज पालखी व देवाच्या मुखवट्याची विधिवत पूजा करण्यात येते. सामुदायिक आरती झाल्यानंतर रथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळते. ‘येळकोट येळकोट, जय मल्हार’च्या जयघोषाने परिसर दणाणून जातो. रात्री रथ व खंडेराव महाराजांची पालखी मिरवत निऱ्हाळे रस्त्यावरील ‘महल’ बागेत नेण्यात येते. याप्रसंगी निऱ्हाळे, सुरेगाव, मऱ्हळ, पांगरी, कणकोरी, खंबाळे, वावी आदि गावांतील भाविक आपले देव महल बागेत भेटीसाठी आणतात. त्यानंतर पहाटे ६ वाजेपर्यंत वाघे मुरळीचा जागरणाचा कार्यक्रम पार पडतो. यावेळी मंदिरातील अनंत योग देव्हाऱ्याचे विधिवत पूजन केले जाते.   रविवारी सकाळी ७ वाजेपासून १० वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. ११ वाजता लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दिवसभर नवसपूर्ती कार्यक्रम पार पडतात. रात्री ९ वाजता लोकनाट्य तमाशा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी सकाळी तमाशा कलावंतांचा हजेरीचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दिवसभर भाविक दर्शनासाठी मंदिरात गर्दी करतात. दुपारी ३ वाजता कुस्त्यांची दंगल होणार असून त्यात राज्यभरातील नामवंत मल्ल सहभागी होणार  आहेत.  मंगळवारी यात्रेच्या शेवटच्या दिवशी मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुले राहणार आहे. रात्री १० वाजता देव घरी जाण्याच्या कार्यक्रमास प्रारंभ होतो. खंडेराव महाराज पालखीची महाल बागेतून मंदिरापर्यंत भंडाऱ्याची उधळण करीत मिरवणूक काढण्यात येते. यावेळी भाविक हातात बुधली घेऊन देवाला निरोप देण्यासाठी मिरवणुकीत सहभागी होतात.  यात्रा काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वावी पोलिसांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सिन्नर आगाराच्या वतीने दिवसभर ‘सिन्नर-निऱ्हाळे’ व ‘पांगरी-मऱ्हळ’ बसेस सुरु असणार आहेत. यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी जय मल्हार मित्र मंडळ व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. (वार्ताहर)पांगरी गावातील प्रत्येकी एका कुळास दरवर्षी यात्रेतील रथाचा मान मिळतो. यंदा ही जबाबदारी पवार व पेखळे यांना हा मान देण्यात आलेला आहे. पांगरी येथून रथ जाईपर्यंत मऱ्हळ कोणताही धार्मिक विधी सुरु होत नाही. शुक्रवारी पांगरी येथे विधीवत पुजा केल्यानंतर सजविला रथ व पालखी मिरवणूक काढून रात्री उशिरा रथ दर्पात नेण्यात आला होता. शनिवारी पुन्हा मिरवणूक काढून रात्री मऱ्हळ गावाकडे रथाचे प्रस्थान होईल.  पांगरी येथून रथ आल्यानंतर यात्रेस सुरुवात होणार आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने सजविलेला रथ वाजत गाजत मंदिरासमोर आल्यावर खंडेराव महाराजांच्या पालखी व मूर्तीची विधिवत पूजा केली जाते.