शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

नायगाव केंद्रावर लसीकरणासाठी तोबा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 00:11 IST

नायगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली. एकाच दिवसात २०० लोकांना प्रतिबंधक लस देण्यात आली.

ठळक मुद्देग्रामपंचायत प्रशासन सतर्क

नायगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली. एकाच दिवसात २०० लोकांना प्रतिबंधक लस देण्यात आली.सिन्नर तालुक्यातील नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या काही दिवसापासून कोरोनाची प्रतिबंधक लस देणे सुरू झाले आहे. आठवड्यातून सोमवार, बुधवार व शनिवार या तीन दिवशी ही लस देण्यात येते. शनिवारी (दि.१०) परिसरातील नागरिकांनी अचानक गर्दी केल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. येथील केंद्रातून २०० नागरिकांना ही लस देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी विजय घिगे यांनी दिली.गेल्या काही दिवसापासून केंद्रात लस उपलब्ध झाली आहे. मात्र सुरुवातीला लस घेण्यासाठी एवढी गर्दी झाली नाही. मात्र गेल्या आठवडाभरापासून नायगावसह खोऱ्यातील गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ही प्रतिबंधक लस घेण्यासाठी सध्या गर्दी होत आहे.नायगाव परिसरात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन सतर्क झाले असून, गर्दी टाळण्यासाठी व मास्कचा वापर वाढविण्यासाठी कठोर उपाययोजना करीत आहे. गाव व परिसरातील कोरोना संख्या कमी करणे आपल्याच हातात असल्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.- मनीषा कदम, सरपंच, नायगाव 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटल