शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसपाटलांचे थकले मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 00:04 IST

नांदूरवैद्य : गावोगावी शांतता सुव्यवस्थेसाठी प्रयत्नशील असणाऱ्या पोलीसपाटलांना पुरेसे मानधन मिळत नाहीच; पण जे आहे तेही वेळेवर दिले जात ...

ठळक मुद्देनाराजी । शासनाकडून दुर्लक्ष; कुटुंबावर उपासमारीची वेळ

नांदूरवैद्य : गावोगावी शांतता सुव्यवस्थेसाठी प्रयत्नशील असणाऱ्या पोलीसपाटलांना पुरेसे मानधन मिळत नाहीच; पण जे आहे तेही वेळेवर दिले जात नाही, नवीन सरकारने तरी या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नाशिक जिल्हा गावकामगार पोलीसपाटील संघटनेने केली आहे.पोलीस व जिल्हा प्रशासनाला गावोगावच्या शांतता व सुव्यवस्थेसाठी मदत करणारा महत्त्वाचा घटक म्हणून पोलीसपाटील यांची ओळख आहे. गाव तंटामुक्त करण्यासाठी पोलीसपाटील यांचे मोठे महत्त्व आहे. तीन वर्षांपूर्वी राज्यात जवळपास १८ हजार पोलीसपाटलांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात सुशिक्षित तरुणांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळाली, तर काही ठिकाणी पदे रिक्त असल्याने इतर गावांचाही अतिरिक्त कार्यभार अनेकांवर दिलेला आहे. राज्यात बहुतांश गावे ही पोलीसपाटील यांच्या माध्यमातून तंटामुक्त झाली. काही गावांत दारूबंदी, अवैध धंदे तसेच गौणखनिज चोरीही रोखण्यात यश आले आहे, त्यांना महिन्याला मानधन मिळावे ही अपेक्षा असते मात्र ते वेळेवर कधीच मिळत नसल्याचे चित्र राज्यभरात दिसून येत आहे.तुटपुंज्या मानधनावर गावची धुरा खांद्यावर सांभाळणाºया पोलीसपाटील यांना चार-चार महिने मानधनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. एप्रिल २०१९ पासून मानधन वाढविण्यात येऊन साडेसहा हजार रुपये करण्यात आले तेव्हापासून तर कधीच वेळेवर मिळत नाही. ग्रामीण भागात काही पोलीसपाटील यांची उपजीविकाच मानधनावर चालत असल्याने त्यांचे आर्थिक गणित कोलमडून उपासमारीची वेळ आली आहे. उच्चशिक्षित पोलीसपाटील यांना अवघे ६५०० रुपये प्रतिमहिना मानधन दिले जाते, शिवाय इतर कुठलीही सुविधा अथवा सुरक्षितता पुरविली जात नाही.पोलीसपाटील हा अत्यंत प्रामाणिक व निष्ठेने काम करतो. शासनाचे कान व डोळे म्हणून पाटलांकडे बघितले जाते, अनेक अधिकारी गावपातळीवर पोलीसपाटलावरच विसंबून काम करतात; परंतु मानधन व इतर मागण्यांबाबत बोलतही नाही. थकीत मानधनाबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांशी भेटून चौकशी केली असता शासनस्तरावरून निधी मिळाला नसल्याचे सांगण्यात आले.- चिंतामण मोरे, जिल्हाध्यक्ष,गाव कामगार - पोलीसपाटील संघटना.

टॅग्स :Governmentसरकार