शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

टिप्पर गँगमधील गुन्हेगारांच्या कोठडीत वाढ

By admin | Updated: July 13, 2016 00:06 IST

टिप्पर गँगमधील गुन्हेगारांच्या कोठडीत वाढ

 नाशिक : सिडकोतील कुप्रसिद्ध टिप्पर गँगचा सूत्रधार नासीर पठाण, गण्या कावळ्या यांच्यासह आठ सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्तांनी २ जुलै रोजी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली़ या सर्वांना न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती़ या सर्व गुन्हेगारांना मंगळवारी (दि़१२) न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात आली आहे़ दरम्यान, या टोळीतील सराईत गुन्हेगार गणेश वाघ ऊर्फ गण्या कावळ्या याने एका साक्षीदारास धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. सिडकोतील टिप्पर गँगचे प्रमुख सूत्रधार न्यायालयीन कोठडीत असतानाही गुन्हेगारीच्या घटना घडत होत्या़ टिप्परची दुसरी फळी सक्रिय झाल्याचे पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन यांच्या लक्षात आले़ त्यांनी शाकीर नासीर पठाण, गणेश सुरेश वाघ ऊर्फ गण्या कावळ्या, मुकेश दलपतसिंग राजपतू, वसीम शेख, शाहीद सय्यद, सोन्या बापू पवार, देवदत्त तुळशीराम घाटोळे, किरण ज्ञानेश्वर पेलमहाले या सर्वांवर मोक्कान्वये कारवाई केली़सिडकोतील शुभम पार्कमधील एका फळविक्रेत्याकडून पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी टिप्पर गँगमधील गुंडांविरोधात मोक्कान्वये कारवाई केली आहे. या गुंडांच्या पोलीस कोठडीदरम्यान मुकेश राजपूत, गण्या कावळ्यासह इतर गुन्हेगार शिवाजीनगरमधील ध्रुवनगर परिसरातील एका इमारतीत राहात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी घरमालकावर गुन्हा दाखल केला आहे. या टोळीतील गुन्हेगारांच्या आर्थिक स्त्रोताचा तपासही पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)