शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांना जमिनीवर झोपवून उपचार करण्याची वेळ

By admin | Updated: May 16, 2015 01:07 IST

रुग्णांना जमिनीवर झोपवून उपचार करण्याची वेळ

मालेगाव : शहरात विविध ठिकाणी महानगरपालिका जलवाहिनी गळतीमुळे होणारा दूषित पाणीपुरवठा, शहरातील तीव्र उन्हाळा व खाद्यपदार्थ विक्रेते- रसवंती याठिकाणी असलेल्या अस्वच्छतेमुळे शहरात अतिसाराची साथ पसरली आहे. येथील मनपाच्या वाडिया, अलीअकबर रुग्णालयासह सामान्य रुग्णालयात अतिसाराच्या रुग्णांची गर्दी होत आहे. विशेष म्हणजे पुरेशा पलंगाअभावी सामान्य रुग्णालयात रुग्णांना जमिनीवर झोपवून त्यांच्यावर उपचार करण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली आहे. शहरात सध्या मनपातर्फे पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या विविध ठिकाणच्या जलवाहिनींना गळती लागलेली आहे. त्यात शेकडो लिटर पाणी वाया तर जातेच परंतू गटारीलगत असणाऱ्या जलवाहिनींमध्ये दुषित पाणी शिरत असल्याने सध्या शहरातील नागरिकांना दुषित पाणी ग्रहण करावे लागत आहे. त्यामुळे पोटदुखीच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दुसरीकडे गेल्या दोन - तीन आठवड्यापासून शहरातील तपमान ४० अंशावर आहे. त्याचा दुष्परिणाम नागरिकांचे आरोग्यमान बिघडले आहे. उन्हापासून बचावासाठी नागरिक शहरातील रसवंतीगृहे, ज्युसपार्लर या ठिकाणी धाव घेत आहेत. परंतू या पाहिजे त्या प्रमाणात स्वच्छता पाळली जात नसल्यामुळे येथून रोगाची बाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच शहरातील अस्वच्छतेमुळे शहरात डासांसोबत माशा, कृमी, कीटक व सुक्ष्मजीवांच्या संख्येतही वाढ झाली आहे. शहरात जागोजागी रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची संख्या अधिक आहे. तेथे देखील पुरेशी स्वच्छता नसल्यामुळे या खाद्यपदार्थांच्या माध्यमातून नागरिकांना बाधा होत आहे. सामान्य रुग्णालयात तर अतिसारावर उपचारासाठी तीन कक्ष तयार करण्यात आले आहेत. मात्र या कक्षांची मर्यादा ही २० ते २५ एवढीच असून तेवढेच पलंग उपलब्ध आहेत. मात्र येथे रोज उपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्या ७० ते ८० एवढी आहे. आधीचे उपचार घेणारे आणि नव्याने दाखल होणारे रुग्ण यामुळे येथे काही रुग्णांना जमिनीवर झोपवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. अशीच परिस्थिती मनपाच्या वाडिया व अलीअकबर रुग्णालयात आहे. शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या याहून अधिक आहे. (प्रतिनिधी)