शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

७० हजार टन ऊस जनावरांसमोर टाकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:13 IST

महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेशात येथून ऊस पाठविला जातो. रसवंतीला तीन हजार रुपये प्रतिटन याप्रमाणे दर मिळतो, तर तोच ...

महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेशात येथून ऊस पाठविला जातो. रसवंतीला तीन हजार रुपये प्रतिटन याप्रमाणे दर मिळतो, तर तोच ऊस कारखाने २२०० ते २५०० रु. प्रतिटनाने घेतात. निफाड तालुक्यातील चांदोरी पंचक्रोशीत सुमारे ५०० ते ७०० व्यापारी कमिशन एजंट म्हणून उसाचा व्यापार करतात. दरवर्षी निफाड तालुक्यातून रसवंतीसाठी ऊस पाठविला जातो. मागील वर्षापासून असलेल्या कोरोना संकटामुळे उसाच्या व्यापारांवर मोठा परिणाम झाला आहे. गतवर्षी आणि याही वर्षी ऐन हंगामात लॉकडाऊन असल्यामुळे उसाची मागणी घटली. ज्या व्यापाऱ्यांनी बाहेर ऊस पाठविला होता, त्यांचे लाखो रुपये बुडाले आहे. यामुळे ऊस व्यापाऱ्यांना लाखोंचा फटका सहन करावा लागला आहे.

चौकट-

साखर कारखान्यांचा आधार

कोरोनामुळे अनेक राज्यांत रसवंतिगृहे सुरूच झाली नाहीत. यामुळे ऊस पडून राहिला आहे. रसवंतीला न गेलेला ऊस नगर जिल्ह्यातील पाच ते सहा कारखाने आणि जिल्ह्यातील कादवा कारखान्याने खरेदी केला आहे. सर्वाधिक ऊस कादवाने घेतला असून या कारखान्यांनी उसाला २२०० ते २५०० रुपये प्रतिटनाचा दर दिला आहे. कारखान्यांनी ऊस खरेदी करूनही निफाड तालुक्यात आज ५० ते ७० हजार मेट्रिक टन ऊस शिल्लक राहिला आहे.

चौकट-

शेतकऱ्यांना आर्थिक फटका

रसवंतीला जाऊन तीन हजार रुपये प्रतिटनाने शेतकऱ्यांना पैसे मिळाले असते, तोच ऊस कोरोनामुळे कारखान्यांना देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कारखान्यांनी कमी दर दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. अनेक ऊस व्यापाऱ्यांना मागील वर्षाचे पैसे ग्राहकांकडून मिळाले नाही; मात्र त्यांना शेतकऱ्यांचे पैसे द्यावे लागले. यामुळे व्यापाऱ्यांनाही लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

कोट-

मागील वर्षी परराज्यात पाठविलेल्या उसाचे पैसे अद्याप मिळालेले नाही. मात्र, शेतकऱ्यांना आम्हाला पैसे द्यावे लागले. यामुळे कोरोनाच्या काळात २५ ते ३० लाख रुपयांचा फटका सहन करावा लागला आहे. चांदोरी पंचक्रोशीत ५०० ते ७०० कुटुंबांना कोरोना आणि लॉकडाऊनचा मोठा फटका सहन करावा लागला असून, यातून सावरणे अवघड झाले आहे. - विनायक खरात, ऊस व्यापारी