शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

लादलेल्या उमेदवारांच्या पालख्या वाहण्याची वेळ !

By admin | Updated: June 18, 2014 13:50 IST

इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील राजकारणातील हारजितसाठी निर्णायक ठरणाऱ्या त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या स्थानिक नेतृत्त्वाची स्थिती मात्र काहीशी दुर्लक्षितच आहे.

त्र्यंबकेश्वर : इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील राजकारणातील हारजितसाठी निर्णायक ठरणाऱ्या त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या स्थानिक नेतृत्त्वाची स्थिती मात्र काहीशी दुर्लक्षितच आहे. त्यामुळेच लादलेल्या उमेदवारांची पाठराखण करण्याची वेळ येथील मतदारांवर आली असून, याहीवेळेस येरे माझ्या मागल्या होते की काय, स्थानिक नेतृत्त्वाला नशीब अजमाविण्याची संधी मिळेल याकडे लक्ष वेधले गेले आहे.विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यापासून दोन्ही तालुक्यांमध्ये इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू आहे. मतदारसंघातील काही इच्छुकांनी अनेक पक्ष बदलले आहेत. त्र्यंबक तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. १९५२ पासूनच्या १४ वेळा झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला नऊ वेळा, कम्युनिस्ट दोन वेळा, शिवसेना दोन वेळातर भाजपा एक वेळा याप्रमाणे पक्षांचे आमदार निवडले गेले आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी आहे. यावेळेस राष्ट्रवादीने जास्त जागांची मागणी केली आहे. या मुद्द्यावर आघाडी, सफल झाल्यास इगतपुरीची जागा कोणाला मिळेल ते आज सांगता येणार नाही. राष्ट्रवादी आघाडी पैकी जागा काँग्रेसला सुटत असल्याने आज तालुक्यावर काँग्रेसचा प्रभाव आहे. गत विधानसभा निवडणुकीत काँगे्रसच्या निर्मला गावित विजयी झाल्या होत्या. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भुजबळांना आघाडी मिळाली होती. तालुक्यात भुजबळांना ३३९१४, तर गोडसे यांना १८५९४ मते मिळाली. यावरून त्र्यंबक तालुक्यात आजही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव आहे. जवळपास साडेपंधरा हजाराची (१५३२0) आघाडी भुजबळांना मिळाली आहे, तर शहरातही ३९0 मतांची आघाडी घेतली आहे. मोदी लाट अन्यत्र असली तरी त्र्यंबक तालुक्यावर फारसा, फरक झाला नाही. जिल्ह्यात इगतपुरी मतदारसंघातच भुजबळांना आघाडी मिळाली असली तरी त्याचे श्रेय त्र्यंबक तालुक्याला आहे. हे कोणीही नाकारणार नाही. मतदारसंघात कोणकोणाला रिंगणात कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार उतरविला जाईल याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.