शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील आश्रमशाळांची वेळ बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:39 IST

येवला : शासकीय व अनुदानित आश्रमशाळांची वेळ सकाळी ११ ते ५ करण्याविषयी तातडीने प्रशासकीय बैठक घेऊन तत्काळ निर्णय घेण्यात येईल. शासकीय आश्रमशाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग लवकरच सुरू केले जातील, शासकीय आश्रमशाळेतील शिक्षण व वसतिगृह विभाग स्वतंत्र करण्याविषयी लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वासन आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दिले.

ठळक मुद्देविष्णू सावरा : शासनमान्य आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेची बैठक

येवला : शासकीय व अनुदानित आश्रमशाळांची वेळ सकाळी ११ ते ५ करण्याविषयी तातडीने प्रशासकीय बैठक घेऊन तत्काळ निर्णय घेण्यात येईल. शासकीय आश्रमशाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग लवकरच सुरू केले जातील, शासकीय आश्रमशाळेतील शिक्षण व वसतिगृह विभाग स्वतंत्र करण्याविषयी लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वासन आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दिले.शासनमान्य आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेची बैठक मंत्रालयात पार पडली. यावेळी आदिवासी शाळांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात येऊन त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे ठरले. शिक्षक आमदार किशोर दराडे, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार दत्तात्रय सावंत, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विक्रम गायकवाड, आदिवासी विभागाचे उपसचिव दत्तात्रय सावंत, सु. ना. शिंदे, संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष राऊत, राज्य कार्याध्यक्ष सुभाष बावा, कार्यकारिणी सदस्य बी.एन. देवरे, नाशिक विभागीय अध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष डॉ. हिरालाल बावा, उपाध्यक्ष विजय खैरनार, शिक्षण सचिव रमेश तारमाळे, नवनीत किल्लारीकर, विलास कटारे, आर.के. चौधरी, प्रा. मिलिंद वाघमोडे, प्रा. अविनाश पाटील, प्रा. चेतन महाले आदी सदस्य उपस्थित होते.आमदार दराडे, देशपांडे, सावंत, संघटनेचे विक्रम गायकवाड यांनी वेळेत बदल करण्याची आग्रही मागणी केली, त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन सावरा यांनी दिले. तसेच शासकीय आश्रमशाळेतील विनासवलत विद्यार्थ्यांना डीबीटी योजना लागू करण्याविषयी निर्णय घेण्यात आला. राज्यातील आश्रमशाळांची वेळ बदलावी यांसह विविध प्रलंबित प्रश्न सोडवा, अशी मागणी नागपूर अधिवेशन काळात आमदार किशोर दराडे यांनी मंत्री सावरा यांची भेट घेऊन केली होती. याप्रश्नी बैठक घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. हे विषय पूर्णत्वास जाईपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवू, असे दराडे यांनी सांगितले.शालेय शिक्षण विभागाप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना पदोन्नतीची संधी तत्काळ निर्माण करण्याविषयी प्रशासकीय पातळीवर निर्णय घेण्यात येईल, शालेय शिक्षण विभागाप्रमाणे पात्रताधारक माध्यमिक शिक्षकांना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकपदी पदोन्नतीची संधी देण्यात येईल, शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांना कार्यालय प्रमुख म्हणून घोषित करणार, कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास निश्चित करण्याविषयी निर्णय घेणार, सेवेत कार्यरत कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात चर्चा झाली.