शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

टवाळखोरांकडून विविध दहा पक्ष्यांची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:25 IST

इंदिरानगर परिसरातील पांडवनगरी भागातील गल्ल्यांमध्ये फिरून झाडांवर दिसणाºया इवल्यासा जीव असलेल्या पक्ष्यांवर गलोलने निशाणा साधत परिसरातील झोपडपट्टी भागातील टवाळखोरांनी शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वनविभागाच्या पश्चिम कार्यालयाने गंभीर दखल घेतली असून, अज्ञात टवाळखोरांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

नाशिक : इंदिरानगर परिसरातील पांडवनगरी भागातील गल्ल्यांमध्ये फिरून झाडांवर दिसणाºया इवल्यासा जीव असलेल्या पक्ष्यांवर गलोलने निशाणा साधत परिसरातील झोपडपट्टी भागातील टवाळखोरांनी शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वनविभागाच्या पश्चिम कार्यालयाने गंभीर दखल घेतली असून, अज्ञात टवाळखोरांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पांडवनगरी परिसरातील बंगल्यांच्या आवारात सर्प निघाल्याचा ‘कॉल’ इको-एको फाउंडेशनच्या सदस्यांना आला. भर दुपारी सर्प रेस्क्यू करण्यासाठी या भागात सदस्य दाखल झाले असता त्यांच्या सदर प्रकार निदर्शनास आला. झोपडपट्टी भागातील काही टवाळखोर अल्पवयीन मुलांचे टोळके हातात गलोल घेऊन शिकार करत असल्याचे दिसले. या संस्थेच्या स्वयंसेवकांनी तत्काळ प्रसंगावधान राखत त्या मुलांशी संवाद साधत त्यांना संशय येऊ दिला नाही. यावेळी त्यांच्याकडे असलेल्या पिशवीत सुमारे दहा पक्षी मृतावस्थेत असल्याचे आढळून आले. सदस्यांनी या घटनेची माहिती तत्काळ वनविभागाला कळविली. वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार व त्यांचे कर्मचाºयांचे पथक घटनास्थळी पोहचेपर्यंत टवाळखोरांनी सदस्यांच्या हातांना चावा घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, सोनार यांनी घटनास्थळी येऊन मृत पक्ष्यांचा पंचनामा केला असून, पशुवैद्यकीय अधिकाºयांमार्फत त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. अज्ञात टवाळखोरांविरुद्ध वनविभागाच्या पश्चिम कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सोनार करीत आहेत.वनविभाग करणार जनजागृतीपांडवनगरी परिसरातील ज्या भागात पक्ष्यांची शिकार करण्यात आल्याचे उघडकीस आले. त्या भागातील रहिवाशांसोबत वनअधिकारी-कर्मचाºयांनी संवाद साधत टवाळखोर कुठल्या भागातील आहे, याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. रंगरेज मळा, भय्यावाडी आदी परिसरात वनविभाग जनजागृती करणार आहे.या पक्ष्यांचा घेतला जीवतीन लालबुड्या बुलबुल, सुगरण, कबुतर, चिमणी, कोकाटेल अशा जातीचे दहा पक्षी टवाळखोरांकडे असलेल्या पिशवीत आढळून आले. या सर्व पक्ष्यांची शिकार गलोलीने करण्यात आल्याचे पशु वैद्यकीय अधिकाºयांनी स्पष्ट केले. दरम्यान, वन्यजीव संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या इको-एकोच्या सदस्यांनी त्या टवाळखोरांची अंगझडती घेत त्यांच्याकडून दहा ते बारा गलोल जप्त केल्या आहेत.