शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

वाघांची गोलंदाजी; कोकाटेंची फटकेबाजी

By admin | Updated: June 30, 2014 00:40 IST

वाघांची गोलंदाजी; कोकाटेंची फटकेबाजी

 

शैलेश कर्पे

सिन्नरआमदार माणिकराव कोकाटे यांनी राजकीय निर्णय घ्यावा, असे विधान बारागावपिंप्री येथील जाहीर कार्यक्रमात करुन गुगली टाकणारे पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब वाघ आणि तोच धागा पकडून पक्षांतराच्या मुद्द्यावर चौफेर फटकेबाजी करणाऱ्या आमदार माणिकराव कोकाटे यांच्या भाषणबाजीमुळे श्रोत्यांनाही या उभयतांचा राजकीय प्रवासाचा गुंता कोड्यात टाकून गेला. कॉँग्रेस पक्षाचे पंचायत समितीचे सभापती असतानाही बाळासाहेब वाघ यांनी लोकसभा निवडणुकीत बंडखोरी करीत हेमंत गोडसे यांच्या मैत्रीखातर शिवसेनेच्या व्यासपीठावर पाऊल ठेवले होते. गोडसे यांच्या विजयानंतर आभार दौऱ्यातही बाळासाहेब वाघ सावलीप्रमाणे गोडसे यांच्यासोबत होते. त्यामुळे वाघ शिवसेनेतच विसावतील असे वाटत असताना, शनिवारी सायंकाळी बारागावपिंप्री येथे आमदार कोकाटे यांच्या हस्ते झालेल्या विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमाला वाघ थेट अध्यक्ष म्हणून हजर राहिले.कोकाटे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी वाघ यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न होत असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर बारागावपिंप्री येथील सभेत वाघ यांनी कोकाटे यांनी राजकीय निर्णय घ्यावा, असे सांगून त्यांच्या कोणत्याही निर्णयासोबत आपण असल्याचे सांगितले. यानंतर कोकाटे यांनी आपल्या भाषणात चौफेर टोलेबाजी करीत संभ्रमात आणखीनच भर टाकली.मी कोणत्या पक्षाचा उमेदवार राहीन याची चिंता करु नका. राज्यात कोणतेही सरकार येऊ द्या, सिन्नरच्या जनतेसाठी पक्ष आणि सरकार आपणच असल्याचे कोकाटे म्हणाले. मी कोणत्याही पक्षात असलो आणि कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी विकासनिधी आणण्याची आपल्यात धमक असल्याचे कोकाटे यांनी सांगितले होते. मी आरपीआयमध्ये गेलो किंवा मायावतीजींचा हत्ती घेतला तरी तुम्ही काळजी करू नका. राजकीय निर्णय घ्यायचा तेव्हा पाहू! अशी फटकेबाजी करीत कोकाटे यांनी जनतेचा संभ्रम कायम ठेवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मलढोण येथील कार्यक्रमात खासदार हेमंत गोडसे, आमदार कोकाटे व पंचायत समितीचे सभापती वाघ एकाच व्यासपीठावर एकत्र आले. यावेळी वाघ यांनी पक्ष म्हणून नाही, तर मित्र म्हणून आपण शिवसेनेच्या व्यासपीठावर गेले होतो, असा खुलासा केला. यावेळी कोकाटे व गोडसे यांनी एकमेकांवर स्तुतिसुमने उधळल्याने राजकीय चर्चेचीही उधळण होणार यात शंका नाही!