शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मजूर संघाच्या अध्यक्षपदी वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 22:53 IST

कळवण : नाशिक जिल्हा मजूर संस्थांच्या सहकारी संघाच्या अध्यक्षपदी कळवणचे हरिभाऊ वाघ, तर उपाध्यक्षपदी नाशिकच्या आशाताई चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ठळक मुद्देबिनविरोध निवड : उपाध्यक्षपदी आशाताई चव्हाण; कार्यकर्त्यांचा जल्लोष

कळवण : नाशिक जिल्हा मजूर संस्थांच्या सहकारी संघाच्या अध्यक्षपदी कळवणचे हरिभाऊ वाघ, तर उपाध्यक्षपदी नाशिकच्या आशाताई चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.जिल्हा मजूर संघाचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी कासव व उपाध्यक्ष प्रमोद भाबड यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी निवडणूक निर्णय अधिकारी सहकार उपनिबंधक प्रेरणा शिवदास यांच्या उपस्थितीत निवडणूक झाली.अध्यक्षपदासाठी कळवणचे हरिभाऊ वाघ यांच्या नावाची सूचना संपतराव सकाळे यांनी मांडली. तिला योगेश हिरे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी नाशिकच्या आशाताई चव्हाण यांच्या नावाची सूचना संभाजी पवार यांनी मांडली. शिवाजी रौंदळ यांनी अनुमोदन दिले. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निर्धारित वेळेत एकेक अर्ज दाखल झाल्याने वाघ व चव्हाण बिनविरोध निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी प्रेरणा शिवदास यांनी केली. संघाच्या वतीने यावेळी हरिभाऊ वाघ, आशाताई चव्हाण, मावळते अध्यक्ष शिवाजी कासव, प्रमोद भाबड, प्रेरणा शिवदास यांचा सत्कार करण्यात आला.जिल्ह्यातील प्राथमिक मजूर सहकारी संस्थाच्या हितासाठी, संवर्धनासाठी व अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असून, मजूर संस्थाना न्याय मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष हरिभाऊ वाघ यांनी सत्काराप्रसंगी दिली. यावेळी संपतराव सकाळे, शिवाजी कासव, प्रतिभा शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले.निवडीप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा पाटील, मजूर संघाचे संचालक राजेंद्र भोसले, संपतराव सकाळे, शिवाजी रौंदळ, योगेश हिरे, दिनकर उगले, संभाजी पवार, नीलेश आहेर, जगन्नाथ वाजे, चिंतामण गावित, प्रमोद मुळाणे, सतीश सोमवंशी, योगेश गोलाईत, सुरेश भोये, विठ्ठल वाजे, शशिकांत आव्हाड, शशिकांत उबाळे, अर्जुन चुंभळे, प्रतिभा शिरसाठ, रमेश शिरसाठ आदी उपस्थित होते.कळवणची परंपरा कायमजिल्हा मजूर संघाच्या कळवण तालुका संचालकपदासाठी आतापर्यंतच्या निवडणुका लाखमोलाने चुरशीच्या केल्या आहेत. त्यामुळे कळवणमधून संचालक झालेला मजूर संघाचा प्रतिनिधी जिल्हा संघावर पदाधिकारी होतो, ही गेल्या २५ वर्षांची परंपरा यंदा हरिभाऊ वाघ यांनी कायम ठेवून कळवणकडे अध्यक्षपद खेचून आणले. याआधी अंबादास अहिरराव (१९७७-७८), केदा अहेर (२०००-०१), शरद गुंजाळ (२००८-०९) यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. तसेच कौतिक पगार, रवींद्र देवरे, योगेश पगार व संगीताताई देवरे यांनी उपाध्यक्षपद भूषविले आहे.