शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

थिरकली तरुणाई; दांडियासाठी गर्दी

By admin | Updated: October 20, 2015 23:55 IST

थिरकली तरुणाई; दांडियासाठी गर्दी

नाशिक : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पंचवटी परिसरात ठिकठिकाणच्या सार्वजनिक नवरात्रोत्सव मित्रमंडळांकडून यंदाही दरवर्षीप्रमाणे गरबा-दांडिया रासचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजेनंतर पंचवटीतील नवरात्रोत्सव मंडळाच्या ठिकाणी युवक-युवतींसह महिला वर्ग दांडिया खेळण्यासाठी, तसेच गरबा नृत्य करण्यासाठी मोठी गर्दी करत असल्याने नवरात्रोत्सवाची धूम वाढली आहे. डीजे साउंडवर मराठी, हिंदी तसेच गुजराथी गाण्यांवर ठेका धरत दांडियाप्रेमी दांडिया खेळण्याची मजा लुटत आहेत. आपल्या मंडळाच्या ठिकाणी दांडियाप्रेमींची दांडिया व गरबा खेळण्यासाठी गर्दी व्हावी, यासाठी मंडळांतर्फे दैनंदिन बक्षीस योजना सुरू करण्यात आली असून, यात लहान बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंतच्या दांडिया खेळणाऱ्यांना रोख रक्कम, तसेच चषक स्वरूपात पारितोषिक दिले जात आहे. परिसरातील काही मंडळांकडून देवीच्या आरतीसाठी राजकीय, तसेच अति महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रित केले जात आहे. नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी यंदा डीजे साउंडसह आकर्षक कमान, तसेच विद्युत रोषणाई केल्याने दांडिया खेळला जाणारा परिसर सायंकाळच्या सुमाराला उजळून निघत आहे. परिसरातील जुने मंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार चौक, सेवाकुंज येथील श्री सप्तशृंगी मित्रमंडळ, हिरावाडीतील एस. एफ. सी. फाउंडेशन, कै. दत्ता मोगरे प्रणित दुर्गा फ्रेंड सर्कल, अयोध्यानगरी मित्रमंडळ आदिंसह पंचवटी गावठाण, मेरी, म्हसरूळ, दिंडोरीरोड, पेठरोड, आडगाव, मखमलाबाद परिसरातील मित्रमंंडळांनी दांडियाचे आयोजन केले आहे. (वार्ताहर)