शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पाळे बुद्रुक परिसरात कोरोनाचे तीन रु ग्ण पॉॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 17:04 IST

पाळे खुर्द : कळवण तालुक्यातील पाळे बुद्रुक परिसरात काल तीन रु ग्णांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. यामुळे पाळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या सर्व कोरोना बाधित रु ग्णांना कोविड सेंटर, मानूर मध्ये दाखल करण्यात आले असुन त्यांच्यावर येथेच उपचार सुरू असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देपाळे खुर्द गावातील प्रशासन,पदाधिकारी उद्घाटन सोहळ्यात दंग

लोकमत न्यूज नेटवर्कपाळे खुर्द : कळवण तालुक्यातील पाळे बुद्रुक परिसरात काल तीन रु ग्णांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. यामुळे पाळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या सर्व कोरोना बाधित रु ग्णांना कोविड सेंटर, मानूर मध्ये दाखल करण्यात आले असुन त्यांच्यावर येथेच उपचार सुरू असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांनी दिली.यात एक महिला (७५) व दोन पुरु ष अनुक्र मे ४० वर्ष व २० वर्ष वय आहे. पाळे बुद्रुक व पाळे खुर्द गावात फक्त गिरणा नदीचे अंतर आहे. असे असताना देखील पाळे खुर्द ग्रामपंचायत प्रशासन सुस्त असुन कुठली रोगप्रतिबंधक व्यवस्था येथे केलेले नाही.पाळे खुर्द ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी या प्रकाराकडे काना डोळा केला आहे. कुठलेही कोरोना प्रतिबंधक उपाययोजना न करता पदाधिकारी व ग्रामपंचायत प्रशासक गावातील गल्ली व चौकाचे नामकरण करण्यासाठी ही मंडळी दंग असल्याचे आढळून आले आहे. गल्ली चौकाचे नामकरण करते वेळी या मंडळींनी कुठेही मास्क तोंडाला लावले नाहीत. सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केले आहे.पाळे परिसरात कोरोनाचे आगमन झाले त्यावर उपाय योजना व प्रतिबंधक यासाठी एकही पदाधिकारी पुढे सरसावलेला नाही. ना ग्रामसेवक तलाठी यांनी गावात हजेरी लावली नाही. आरोग्य विभागानेही कुठलीच दखल घेतली नाही.सद्यस्थितीत गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून गटारी तुंबल्या आहेत. पडीक प्लॉटमध्ये गवताचे साम्राज्य आहे. कुठल्याही प्रकारची रोग प्रतिबंधक फवारणी गावात ग्रामपंचायत विभागाकडून अथवा आरोग्य विभागाकडून केलेली नाही.पाळे खुर्द येथे भर चौकात जमेला कचरा व घाण.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतcorona virusकोरोना वायरस बातम्या