नाशिक : मोबाइलचे दुकान टाकून ग्राहकांना बनावट मोबाइल विक्र ी करणाऱ्या तिघा संशयितांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात कॉपी राईट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित कर्नाराम भलाजी देवाशी, जितेश कुमार तोतराम चौधरी (२३) आणि दलपतिसंग मोहनिसंग राठोड अशी या तिघांची नावे आहेत. विनोद काशीनाथ नाईक (रा. ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांनी महात्मा गांधी रोडवरील प्रधान पार्क येथे वेगवेगळ्या ठिकाणी मोबाइलचे दुकान टाकून ग्राहकांना बनावट मोबाइलचा माल विक्र ी केला होता. त्यामुळे नाईक यांनी कॉपी राईट कायद्यान्वये या तिघांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. (प्रतिनिधी)
तीन संशयितांवर कॉपीराईट अॅक्टन्वये गुन्हा दाखल
By admin | Updated: November 30, 2014 00:38 IST