शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

विषारी औषध सेवन करून जिल्ह्यात तिघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 00:42 IST

नाशिक : जिल्ह्यातील सिन्नर, हरसूल व दिंडोरी तालुक्यातील तिघांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ यामध्ये दोन महिला व एका पुरुषाचा समावेश असून, या घटनांची संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

ठळक मुद्दे दोन वर्षांपूर्वी एक लाख चाळीस हजार रु पये पीक कर्ज घेतले होते.

नाशिक : जिल्ह्यातील सिन्नर, हरसूल व दिंडोरी तालुक्यातील तिघांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ यामध्ये दोन महिला व एका पुरुषाचा समावेश असून, या घटनांची संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़सिन्नर तालुक्यातील मोहदरी येथील सतरा वर्षीय रेखा भगवान आंबोरे या तरुणीने मंगळवारी (दि़९) सकाळी उंदीर मारण्याचे औषध सेवन केले़ ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच तिचा भाऊ गौतम आंबोरे याने तत्काळ बिटको व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता बुधवारी (दि़१०) उपचारादरम्यान मृत्यू झाला़ या घटनेची सिन्नर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़हरसूल तालुक्यातील खोडची वाडी येथील विवाहिता चित्रा संजय खाडे (२६) हिने बुधवारी (दि़१०) सकाळी विषारी औषध सेवन केले़ ही बाब लक्षात येताच तिचे पती संजय खाडे यांनी गिरणारे येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता दुपारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला़ या घटनेची हरसूल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथील वैभव विष्णू वाघ (२३) या तरुणाने मंगळवारी (दि़९) सकाळी विषारी औषध सेवन केले़ त्यास वडील विष्णू वाघ यांनी तत्काळ दिंडोरी व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता बुधवारी उपचारादरम्यान त्याचामृत्यू झाला़ या घटनेची दिंडोरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़जवळकी येथील शेतकऱ्याची आत्महत्या नांदगाव : तालुक्यातील जवळकी येथील तरु ण शेतकरी काशीनाथ श्रावण गायकवाड (५०) यांनी सततच्या नापिकीला कंटाळून मंगळवारी (दि.९) सकाळी ११ वाजता कपाशी पिकावर फवारणी करण्यासाठी आणलेले विषारी कीटकनाशक प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यांचे बंधू प्रकाश यांनी दिली. काशीनाथ गायकवाड यांना तातडीने बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारीडॉ. उस्मान घोडके यांनी प्रथमोपचार करून औरंगाबाद येथील शासकीय घाटी रु ग्णालयात अधिक उपचारासाठी पाठविले होते. तेथे उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुले, दोन भाऊ, सहा पुतणे, दोन बहिणी असा परिवार आहे.काशीनाथ यांनी वडील श्रावण चिंधा गायकवाड यांच्या नावावर असलेली शेतजमीन गट नंबर ५०८/२ क्षेत्र ४ हेक्टर १८ गुंठे या जमिनीवर बोलठाण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीकडून दोन वर्षांपूर्वी एक लाख चाळीस हजार रु पये पीक कर्ज घेतले होते. त्याचे व्याज ३२,७०० रु पये कालपर्यंत झाले होते. त्यांनी वडिलांच्या नावावर घेतलेले कर्ज कर्ज माफी योजनेअंतर्गत माफ झालेले नसल्याची माहिती सोसायटीचे सचिव कैलास कर्ने यांनी दिली. त्यांचा लहानभाऊ कैलास लहानपणापासून अपंग आहे.